पुणे - हावडा एक्स्प्रेसच्या लेटमार्कमुळे प्रवाशांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 17:33 IST2025-06-01T17:33:37+5:302025-06-01T17:33:58+5:30

पुण्यातून सुटणाऱ्या झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस (हावडा), दानापूर या प्रमुख रेल्वे गाड्या आहेत.

Railway Passenger are suffering due to late marking of Pune-Howrah Express | पुणे - हावडा एक्स्प्रेसच्या लेटमार्कमुळे प्रवाशांना मनस्ताप

पुणे - हावडा एक्स्प्रेसच्या लेटमार्कमुळे प्रवाशांना मनस्ताप

पुणे : पुण्यावरून सुटणारी पुणे-हावडा एक्स्प्रेस ही विभागातील महत्त्वाची गाडी आहे. परंतु या गाडीला वारंवार उशीर होत आहे. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. पुण्यावरून रविवारी (दि.१) सायंकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी सुटणारी रेल्वे हावडावरून येणाऱ्या गाडीला उशीर होत असल्याने रेक उपलब्ध नसल्याने सोमवारी (दि.२) पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी सुटणार आहे. यामुळे गाडी तब्बल नऊ तास उशिराने सुटणार, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाकडून ‘एक्स’ या माध्यमावरून प्रवाशांना देण्यात आली आहे.

पुण्यातून सुटणाऱ्या झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस (हावडा), दानापूर या प्रमुख रेल्वे गाड्या आहेत. त्यामुळे या रेल्वेगाड्यांना कायम प्रवाशांची गर्दी असते. परंतु गेल्या काही दिवस आठवड्यातून दाेन-तीन दिवस हावडा एक्स्प्रेसला रेक उपलब्ध नसल्याने उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ताटकळत बसावे लागत आहे.

पुणे ते हावडा दरम्यान धावणाऱ्या रेल्वेला दोन दिवस लागतात. यामुळे या गाडीसाठी पुण्यातून चार रेक वापरले जातात. परंतु अनेक विभागात रेल्वेच्या तिसऱ्या आणि चाैथ्या मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे पुण्यात पोहोचायला उशीर होत आहे. त्यामुळे पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे गाडीला विलंब होत असून, त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

Web Title: Railway Passenger are suffering due to late marking of Pune-Howrah Express