शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

राघोजी भांगरे यांचा लढा आजही प्रेरणादायी

By admin | Updated: August 9, 2015 03:30 IST

इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये आदिवासी समाजातील राघोजी भांगरे यांचे नाव घेतले जाते. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले.

घोडेगाव : इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये आदिवासी समाजातील राघोजी भांगरे यांचे नाव घेतले जाते. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले. तेव्हा पुणे, नाशिक, ठाणे व अहमदनगर जिल्ह्यात इंग्रज व सावकारांविरुद्ध राघोजी भांगरे लढले. राघोजी भांगरेंचा लढा भावी पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे. सन १८२८ मध्ये इंग्रजांनी आदिवासी भागात असलेले किल्ले, घाटमाथे राखण करण्याचे अधिकार काढून घेतले, तसेच अनेक बुरुज नष्ट केले, आदिवासी किल्लेदारांच्या किल्ल्या काढून घेतल्या, वनदऱ्या काढल्या व पगार कमी केले. त्यामुळे आदिवासी वतनदार व किल्लेदार यांच्यात असंतोष पसरला. तसेच गोरगरीब शेतकऱ्यांचा शेतसारा वाढविला. हा वाढलेला शेतसारा भरण्यासाठी आदिवासी लोक सावकारांकडून कर्ज काढू लागले. सावकार शेतकऱ्यांकडून भरमसाट व्याज गोळा करू लागले. शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधात दावे दाखल करून मालमत्ता जप्त करण्याचे हुकूमनामे इंग्रजांकडून मिळवत असत. या सर्व छळवादाला चिडून आदिवासी लोकांनी इंग्रज व सावकारांविरुद्ध बंड पुकारले. त्यातच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून सन १८३० मध्ये इंग्रजांनी फासावर लटकवले. यामुळे बंडखोरांमध्ये दहशत बसेल, असे इंग्रजांना वाटत होते; परंतु याचा परिणाम उलट झाला. पुणे व नगर जिल्ह्याच्या परिसरात आदिवासी समाजातील राघोजी व बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार उठाव सुरू झाला. राघोजी भांगरे अकोले तालुक्यातील नेरा गावातील होते. सन १८३८ मध्ये रतनगडाच्या परिसरात त्यांनी बंड उभे केले. इंग्रज अधिकारी कॅ. मॅकिटोस याने या भागातील खिंड, घाट, रस्ते यांची माहिती करून घेतली व बंडकऱ्यांचे सर्व मार्ग रोखून धरले. बंडखोरांची सर्व गुपिते बाहेर काढून त्यांना वेठीस धरले; मात्र बंडखोर नरमले नाहीत. इंग्रजांच्या ताब्यात असलेली चार ठिकाणे बंडखोरांनी लुटली. इंग्रजांनी हा सर्व भाग मोठे सैन्यबळ उभे केले. याला लोक घाबरले व काही लोक उलटले. माहितीच्या आधारावर इंग्रजांनी ८० लोकांना ताब्यात घेऊन नगरच्या तुरुंगात टाकले. इंग्रजांनी राघोजीला पकडण्याची मोहीम तीव्र केली. त्या काळी राघोजीला पकडण्यासाठी पाच हजार रुपये बक्षीस ठेवले. त्यांच्याजवळचे प्रमुख लोक ठार झाले, त्यामुळे राघोजी भांगरे थकले. २ जानेवारी १८४८ रोजी इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने चंद्रभागेच्या काठी राघोजीला अटक केली. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. न्यायाधीशांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली. फाशी देण्याऐवजी तलवारीने किंवा बंदुकीने वीरपुरुषांसारखे मरण द्या, अशी मागणी त्याने न्यायाधीशांकडे केली; परंतु इंग्रज सरकारने २ मे १८४८ रोजी ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात त्यांना फासावर चढविले. (वार्ताहर)