शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव ढमढेरेत पहाटे चारपासूनच लसीकरणासाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:09 IST

तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, पारोडी, शिवतक्रार, म्हाळुंगी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, कोंढापुरी, ...

तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, पारोडी, शिवतक्रार, म्हाळुंगी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, कोंढापुरी, बुरूंजवाडी,शि क्रापूर, सणसवाडी, दरेकरवाडी, कोरेगाव-भीमा, वाडा पुनर्वसन, डिंग्रजवाडी, धानोरे या सोळा गावांतील चार टप्प्यांमधील ४५ वर्षांच्या पुढील ९ हजार १०८ नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.

अनेक गावांचे वाढते शहरीकरण व औद्योगिक वसाहतीमुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या १६ गावांची लोकसंख्या सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त आहे. तरीदेखील प्रशासनाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळणारी लस फक्त २०० च्या दरम्यान उपलब्ध होत असल्याने अनेक नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी दूर अंतरावर येऊन उन्हातानात उभे राहूनही हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे. शुक्रवार दिनांक ७ रोजी फक्त ८० लस उपलब्ध झाली. त्यानंतर सलग दोन दिवस शनिवार, रविवार लसीचा पुरवठा न झाल्याने लसीकरण बंद होते. सोमवारी फक्त १८० लस उपलब्ध झाली. सोळा गावांतील नागरिकांनी आज पहाटे चारपासूनच लसीकरणासाठी हजेरी लावल्याने दहा वाजण्याच्या दरम्यान साधारण पाचशे नागरिक लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आले होते. त्यामुळे गोंधळ उडाला. नंबरला उन्हात उभा राहूनही अनेकांना लस न घेताच घरचा रस्ता धरावा लागला. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरणासाठी मोठे हाल होत आहेत.

तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राला सोळा गावे जोडली असल्याने दररोज किमान ५०० लस मिळावी, अशी नागरिकांची मागणी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला ज्यादा लसीचा पुरवठा झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहा उपकेंद्रांच्या माध्यमातून ही लस दिली गेल्यास लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय होणार नाही.

तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांनी केलेली गर्दी.