शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुढीपाडव्याला देवदर्शन करून परतणाऱ्यांवर काळाचा घाला; पुणे - नगर महामार्गावरील अपघातात शिरूरच्या चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 11:58 IST

शिरूरच्या आमदाबाद येथील चौघांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी

टाकळी हाजी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवदर्शन करूण परतलेल्या आमदाबाद (ता.शिरूर) येथील भाविकांचा अपघात झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आमदाबाद गावावर शोककळा पसरली आहे .

आमदाबाद ता शिरूर  येथील भाविक बुधवारी ( दि.२२) देवदर्शनासाठी देवगड व शनी शिंगणापूर येथे गेले होते.देवदर्शन करून परतत असताना रात्री सव्वा बाराच्या सुमारास पुणे -नगर महामार्गावर सुपे ते कामरंगाव च्या दरम्यान चौधरी ढाब्याजवळ कंटेनर आणि ट्रक चा भीषण अपघात झाला. यावेळी कंटेनर भाविकांच्या गाडीवर आदळला असून कंटेनरचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

अपघातात आमदाबाद येथील राजेंद्र विष्णू साळवे (वय ३३ वर्ष), विजय राजेंद्र अवचिते (वय २६ वर्षे), धीरज मोहिते (वय १० वर्षे), मयुर संतोष साळवे ( वय २५ वर्षे), यांचा मुत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर अ.नगर येथील पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आमदाबाद गावावर शोककळा पसरली आहे. गावातील प्रमुखांनी नगरकडे धाव घेतली आहे. अपघात जखमी झालेल्यांवर उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे माजी चेअरमन अशोक माशेरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरAccidentअपघातgudhi padwaगुढीपाडवाDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल