अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने पटकावला पुरुषाेत्तम करंडक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 11:08 PM2018-09-02T23:08:21+5:302018-09-02T23:09:26+5:30

अहमदनगरने सलग दुसऱ्या वर्षी पुरुषाेत्तम करंडक अापल्याकडे नेला अाहे. यंदा नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या पी. सी. अाे. या एकांकिकेने पुरुषाेत्तम करंडक पटकावला.

purushottam karandak won by pemraj sarda college from ahamadnagar | अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने पटकावला पुरुषाेत्तम करंडक

अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने पटकावला पुरुषाेत्तम करंडक

googlenewsNext

पुणे : नवोदित युवकांना नाटकाची गोडी लावून त्यांच्यातील सृजनशीलतेला वाव देणा-या प्रसिध्द पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला. यात अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या  ’’पी.सी.ओ’’ या एकांकिकेने बाजी मारत यंदाच्या पुरुषोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. सलग दुस-या वर्षी नगरच्या महाविद्यालयाने या करंडकावर आपली मोहोर उमटविली. स.प. महाविद्यालयाच्या  ‘‘बातमी क्रमांक 1 करोड एक’’ या एकांकिकेने व्दितीय हरि विनायक करंडक तर मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या ’’अफसाना’’ एकांकिकेला तृतीय क्रमांकाचा संजीव करंडक मिळाला. फर्ग्युसन महाविद्यालयाची  ‘‘विपाशा’’ ही एकांकिका यावर्षीचा जयराम हर्डीकर करंडक मिळवणारी सर्वोत्कृष्ठ प्रायोगिक एकांकिका ठरली.

    सर्वाेत्कृष्ट दिग्दर्शक- विनाेद गरुड, एकांकिका- पी. सी. अाे,  महाविद्यालय - पेमराज सारडा महाविद्यालय
    सर्वाेत्कृष्ट विद्यार्थी लेखक- शुभम गिजे, गंधर्व गुरवेळकर, एकांकिका- दाेन पंथी, महाविद्यालय- बीएमसीसी
    सर्वाेत्कृष्ट विद्यार्थी प्रायाेगिक लेखक- प्रणव अापटे, एकांकिका- टी. एल. अाे, महाविद्यालय- गरवारे वाणिज्य महाविद्यालय
    सर्वाेत्कृष्ट अायाेजित संघ - नवलमल फिराेदिया विधी महाविद्यालय.

रविवारी भरत नाट्य मंदिर येथे पुरुषोत्तम करंडकाची अंतिम फेरी पार पडली. यावेळी नऊ संघामध्ये चुरस पाहवयास मिळाली. अभिनेते शरद पोंक्षे, केशव साठे, माधव अभ्यंकर यांनी अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले. 

Web Title: purushottam karandak won by pemraj sarda college from ahamadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.