शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

सोमेश्वरच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप तर उपाध्यक्षपदी अनंदकुमार होळकर बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 1:02 PM

सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (someshwar sugar factory) अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची तर उपाध्यक्षपदी अनंदकुमार होळकर यांची ...

सोमेश्वरनगर:बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (someshwar sugar factory) अध्यक्षपदी पुरुषोत्तम जगताप यांची तर उपाध्यक्षपदी अनंदकुमार होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने निर्विवाद सत्ता स्थापन केली. यामध्ये भाजप पुरस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही. 

आज सोमेश्वर कारखान्यावरील मुख्य कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आज आयोजित केलेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत ही निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी पुरुषोत्तम जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने तर उपाध्यक्षपदासाठी अनंदकुमार होळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने याठिकाणी या दोघांची निवड करण्यात आली.

अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडीचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याने पवार यांच्या सुचनेनुसार बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा केली. यावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, संचालक कौस्तुभ चव्हाण, जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य हनुमंत भापकर, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व मिलिंद टांकसाळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेElectionनिवडणूकSugar factoryसाखर कारखानेbaramati-acबारामती