शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Pravin Darekar: निवडणुकीच्या तोंडावर दौरे करून काय होणार नाही, पुणेकर हा सजग मतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 2:29 PM

कोणाच्या हाती सत्ता द्यायची हे पुणेकरांना माहित आहे

ठळक मुद्देनवाब मलिक किंवा संजय राऊत यांचं बोलणं लोक गांभीर्याने घेत नाहीत

पुणे : राज्यात अवघ्या काही महिन्यांवर महापालिका निवडणूक येऊ ठेपली आहे. सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच मंत्रिमंडळीही जिल्ह्यांना भेटी देत आहेत. कार्यकर्त्यांची फळी मजबूत करण्याबरोबरच नागरिकांमध्ये पक्षाबद्दलच्या विकासकामांची माहिती पोहोचवण्याचं काम चालू आहे. पुण्यातही गेल्या दोन महिन्यात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी अशा सर्व पक्षाचे राजकीय नेते येऊ लागले आहेत. त्यावरच प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलं आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. 

दरेकर म्हणाले, ''पुण्यातील मतदार हा सजग मतदार आहे. मतदान करताना माणूस आणि विकासकाम पाहून तो मत देतो. त्यामुळं कोणाच्या हाती सत्ता द्यायची हे त्यांना माहीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अनेक राजकीय नेते आणि मंत्रीमंडळी निवडणुकीच्या तोंडावर दौरे करत आहेत. त्यानं काही होत नसल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.''

सध्या प्रभाग कितीचा असावा यासाठी महाविकास आघाडीत निर्णय होण्यास विलंब झाला. सुरुवातीला तीनचा आणि नंतर दोनचा प्रभाग करणार. आणि शेवटी तीनचा प्रभाग करण्यावर शिक्कमोर्तब करण्यात आला. त्यावर दरेकर यांनी सांगितले कि,  आम्ही काम करत असताना एकचा दोनच प्रभाग म्हणून काम केलं नाही. तर आमच्या नगरसेवकांनी प्रभागाचा विचार न करता काम केलेली आहेत. 

संजय राऊत राज्यभरात दौरे करून पक्षबांधणी करू लागले आहेत. शिवसैनिकांना त्यांच्या शहरात शिवसेनेचे वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देत आहेत. त्याबरोबरच विरोधकांवर जोरदार टिळकही केली जात आहे. तसेच नवाब मलिकही राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना केंद्राकडे बोट दाखवत आहेत. त्यावरच दरेकर यांनी सवाल उपस्थित केला आहे.  

''नवाब मलिक किंवा संजय राऊत यांचं बोलणं लोक गांभीर्याने घेत नाहीत. राऊत किंवा मलिकांनी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर काही भूमिका मांडली का ? असा सवाल उपस्थित करत त्यांना केवळ राजकीय बोलणं जमतं असा ते म्हणाले आहेत.''  

केंद्राकडे बोट दाखवण्याचे राजकारण बंद करा  ''केंद्राने सर्व संकटात राज्याला मदत केली आहे. अजूनही आम्ही मदतीची मागणी करू. राज्य सरकारला आपल्या जबाबदारीपासून पळता येणार नाही. केंद्र त्यांची जबाबदारी निभावेल, केंद्राकडे बोट दाखवण्याचे राजकारण बंद करा आणि तात्काळ मदत करा. देवेंद्र फडणवीस यांनी कालच केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे. पूर भागाच्या पाहणीकरता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मी दोन दिवसांनी मराठवाड्याचा दौरा करणार आहोत, ही माहितीही दरेकर यांनी दिली.''

टॅग्स :Puneपुणेpravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस