वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मावळमध्ये राष्ट्रवादीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आमदार सुनील शेळके प्रतिक्रिया देताना भावुक झाले. अजित पवार नसल्यामुळे आनंदोत्सव साजरा करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अजितदादा असते तर आम्ही जल्लोषात विजयोत्सव साजरा केला असता. मात्र, या कठीण परिस्थितीत मावळच्या जनतेने राष्ट्रवादीला भक्कम साथ दिली. अजितदादांनी मावळच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर केला. त्यातून अनेक महत्त्वाच्या विकासकामांना सुरुवात झाली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत मावळमध्ये जे परिवर्तन होत आहे, त्यामागे दादांचे मोठे योगदान आहे.
आमदार शेळके म्हणाले की, आजचा निकाल म्हणजे मावळच्या जनतेने अजितदादांच्या ऋणातून उतराई होण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे.
अजितदादांचा विषय निघताच डोळे पाणावले
अजित पवार यांचा विषय निघताच आमदार शेळके अचानक भावुक झाले. अजितदादांच्या आठवणींनी त्यांचे डोळे पाणावले आणि काहीक्षण ते बोलू शकले नाहीत. उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले. शेळके यांनी थोडा वेळ घेत स्वतःला सावरले, मात्र पुढे फारसे बोलणे त्यांना शक्य झाले नाही.
कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतही अश्रू दिसून आले. हा विजय केवळ राजकीय नाही, तर भावनिक आहे, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.
Web Summary : Following NCP's victory in Maval, MLA Sunil Shelke expressed emotion, missing Ajit Pawar. Shelke credited Pawar's contributions to Maval's development and said the victory was a tribute to him. The atmosphere was charged with emotion.
Web Summary : मावल में राकांपा की जीत के बाद, विधायक सुनील शेल्के भावुक हो गए, अजित पवार को याद किया। शेल्के ने मावल के विकास में पवार के योगदान को श्रेय दिया और कहा कि यह जीत उन्हें श्रद्धांजलि है। माहौल भावनाओं से भरा था।