Pune ZP Election Result 2026: पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी २ जागांवर तर शिंदेसेना एका जागेवर आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:19 IST2026-02-09T12:19:05+5:302026-02-09T12:19:36+5:30
Pune ZP Election Result 2026 माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी निर्णयाक आघाडी घेतली आहे.

Pune ZP Election Result 2026: पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी २ जागांवर तर शिंदेसेना एका जागेवर आघाडीवर
मंचर:आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट प्रत्येकी दोन जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट एका जागेवर आघाडीवर असून माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी निर्णयाक आघाडी घेतली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरुवात झाली. एकूण 20 टेबलवर ही मतमोजणी सुरू होती. पहिल्या फेरीपासूनच मतमोजणी चढ-उतार जाणवत होता. दहा फेऱ्यानंतर चित्र स्पष्ट होऊ लागले. बोरघर शिनोली व पारगाव जारकरवाडी या दोन जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील यांनी निर्णयक आघाडी घेतली आहे. पेठ घोडेगाव गटामध्ये शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. कळंब चांडोली व अवसरी पिंपळगाव या दोन जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. एकीकडे जिल्हा परिषदेचे उमेदवार चांगली मते घेत असताना पंचायत समितीच्या उमेदवारांना क्रॉस वोटिंगचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. अवसरी पिंपळगाव गटात मतांची आघाडी कमी असल्याने निकाल बदलण्याची शक्यता आहे.