सासवड : पुरंदर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. भाजपानेजिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या दोन जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समितीच्या चार जागा मिळवल्या आहेत. मात्र उद्धवसेनेला या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. सद्यस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटाला पंचायत समितीच्या फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत चुरशीच्या लढतींमुळे सत्तासमीकरणामध्ये उलथापालथ झाली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा), आणि काँग्रेस यांच्यातील थेट तिरंगी आणि काही ठिकाणी चौरंगी लढती झाल्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहण्यासाठी संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. गतवेळी शिवसेना शिंदे गटाचे तीन आणि काँग्रेसचा एक जिल्हा परिषद सदस्य होता, तर पंचायत समितीत सहा शिंदेसेना सदस्य आणि काँग्रेसचे दोन सदस्य होते, व राष्ट्रवादीचे एकही सदस्य नव्हते.
प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, ज्योती झेंडे, हेमंतकुमार माहूरकर, गौरव विजय कोलते, समीर जाधव, दिव्या गंगाराम जगदाळे, पुष्कराज जाधव, रमेश इंगळे, अमोल कामठे, भारती अतुल म्हस्के, सविता बरकडे, आणि बाळासाहेब मगर यांचा समावेश आहे. दिवे गराडे गटातून वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांची मुलगी रूपाली झेंडे राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या आहेत. रूपाली झेंडे आयपीएस अधिकारी अमोल झेंडे यांच्या पत्नी आहेत, तर त्यांच्या बंधू अमित झेंडे देखील पंचायत समिती दिवे गणातून विजेते ठरले आहेत.
जिल्हा परिषदेचे प्रमुख विजयी उमेदवार
- दिवे-गराडे गट: रूपाली अमोल झेंडे विजयी (एकूण मते २१८२४— राष्ट्रवादी काँग्रेस अप गट)- बेलसर-माळशिरस गट: अजय इंगळे (एकूण मते ७६२७— भाजपा)- वीर-भिवडी गट: हरीभाऊ लोळे (एकूण मते— ११६३०— भाजपा)- निरा-कोळविहीरे गट: डाॅ. प्राजक्ता दुर्गाडे (एकूण मते— १३५२१— राष्ट्रवादी काँग्रेस अप)
पंचायत समितीचे विजयी उमेदवार
- गराडे गण: अर्चना कटके (एकूण मते— ८०४३— राष्ट्रवादी काँग्रेस अप)- दिवे गण: अमित झेंडे (एकूण मते— १३४५६— राष्ट्रवादी काँग्रेस अप)- माळशिरस गण: माऊली यादव (एकूण मते— ५४२४— भाजपा)- बेलसर गण: माणीक निंबाळकर (एकूण मते— ४८०७— शिवसेना)- भिवडी गण: सायली शिंदे (एकूण मते— ६७९१— भाजपा)- वीर गण: प्रविण जगताप (एकूण मते— ५९४०— शिवसेना)- निरा-शिवतक्रार गण: मोनिका कांबळे (एकूण मते— ६१३६— राष्ट्रवादी अप)- कोळविहीरे गण: स्मिता निगडे (एकूण मते— ५७२९— राष्ट्रवादी अप)
Web Summary : In Purandar, BJP and NCP triumphed in the ZP, Panchayat Samiti elections. Shinde's Sena secured two seats, while Congress and Uddhav's Sena faced defeat, potentially shifting Panchayat Samiti power to NCP.
Web Summary : पुरंदर में, भाजपा और राकांपा ने जिला परिषद, पंचायत समिति चुनावों में जीत हासिल की। शिंदे सेना को दो सीटें मिलीं, जबकि कांग्रेस और उद्धव सेना को हार का सामना करना पड़ा, जिससे पंचायत समिति की सत्ता राकांपा को मिलने की संभावना है।