Pune ZP Election Result 2026: बारामतीकरांनी अजितदादांचा शब्द राखला; एकहाती राष्ट्रवादीचे वर्चस्व, दादांनी दिलेल्या २ जागेवर भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:35 IST2026-02-09T18:33:17+5:302026-02-09T18:35:21+5:30

Pune ZP Election Result 2026 अजित पवार यांनी पंचायत समितीसाठी २ जागा दिल्या होत्या. त्या दोन्ही जागांवर भाजपचे उमदेवार विजयी झाले आहेत. उर्वरीत जागांवर भाजपचा सुपडासाफ झाला आहे

Pune ZP Election Result 2026 Baramati citizens keep Ajit's word; NCP dominates single-handedly, BJP wins 2 seats given by Ajit | Pune ZP Election Result 2026: बारामतीकरांनी अजितदादांचा शब्द राखला; एकहाती राष्ट्रवादीचे वर्चस्व, दादांनी दिलेल्या २ जागेवर भाजप

Pune ZP Election Result 2026: बारामतीकरांनी अजितदादांचा शब्द राखला; एकहाती राष्ट्रवादीचे वर्चस्व, दादांनी दिलेल्या २ जागेवर भाजप

बारामती: बारामतीत जिल्हा परीषद ,पंचायत समिती निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या उमेदवारांना विजयी करीत बारामतीकरांनी आपल्या नेत्याचा मान उंचावला. जिल्हा परिषदेच्या सर्व ६ जागांसह पंचायत समितीच्या १० जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली.

अजित पवार यांनी पंचायत समितीसाठी दोन जागा दिल्या होत्या. त्या दोन्ही जागांवर भाजपचे उमदेवार विजयी झाले आहेत. उर्वरीत जागांवर भाजपचा सुपडासाफ झाला आहे. बारामतीत विजयाचा कोणताही जल्लोष झाला नाही. निवडीनंतर विजयी उमेदवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करीत श्रघ्दांजली अर्पण केली.

बारामती जिल्हा परीषद गट विजयी उमेदवार

१)सुपा जिल्हा परीषद गट...पल्लवी प्रमोद खेत्रे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष) 
२)गुणवडी जिल्हा परीषद गट...शुभांगी कचेर शिंदे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)
३) पणदरे जिल्हा परीषद गट... मंगेश प्रतापराव जगताप (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष) 
४)वडगांव निंबाळकर जिल्हा परीषद गट ...रोहिणी संदिप कदम (ढोले)(राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)
५) निंबुत जिल्हा परीषद गट ...करण संभाजीराव खलाटे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष) 
६)निरावागज जिल्हा परीषद गट ...शिवानी अभिजीत देवकाते (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)

बारामती तालुका पंचायत समिती गण विजयी उमेदवार

१)सुपा गण....उज्वला पोपट खैरे (भाजप)
२)कार्हाटी गण...शामल सुनील वाबळे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)
३)शिर्सुफळ गण...अनिकेत प्रभाकर गावडे (भाजप)
४)गुणवडी गण...शुभांगी सुनील आगवणे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)
५) पणदरे गण...किरण रावसाहेब तावरे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)
६)मुढाळे गण...वैशाली अशोक कोकणे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)
७) मोरगांव गण...बाबा रामा चोरमले (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)
८)वडगांव निंबाळकर गण... जितेंद्र भगवान पवार (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)
९)निंबुत गण...दिग्वीजय धन्यकुमार जगताप(राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)
१०) कांबळेश्वर गण.... आशाबाइ विठ्ठल वायाळ (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष).
११)निरावागज गण...नितीन अरुण काकडे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष).
१२)डोर्लेवाडी गण...राजश्री भुषण टकले (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष).

Web Title : बारामती में अजित दादा का सम्मान: NCP का ZP चुनाव में दबदबा।

Web Summary : बारामती के मतदाताओं ने अजित पवार का सम्मान रखा, NCP को ZP चुनावों में जीत दिलाई। NCP ने सभी 6 ZP सीटें और 10 पंचायत समिति सीटें जीतीं। बीजेपी ने पवार द्वारा आवंटित दो पंचायत समिति सीटें जीतीं।

Web Title : Baramati voters uphold Ajit Dada's word; NCP dominates ZP election.

Web Summary : Baramati voters honored Ajit Pawar by ensuring NCP's victory in ZP elections. NCP won all 6 ZP seats and 10 Panchayat Samiti seats. BJP won two Panchayat Samiti seats allotted by Pawar.