पुणे - नाशिक महामार्गावर हॉटेल मालकाशी झालेल्या किरकोळ वादातून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 13:19 IST2021-08-11T13:19:20+5:302021-08-11T13:19:31+5:30

दुसऱ्याच्या अंगावर चारचाकी मोटार घालून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

Pune: A youth was killed in a minor dispute with a hotel owner on Nashik Highway | पुणे - नाशिक महामार्गावर हॉटेल मालकाशी झालेल्या किरकोळ वादातून तरुणाचा खून

पुणे - नाशिक महामार्गावर हॉटेल मालकाशी झालेल्या किरकोळ वादातून तरुणाचा खून

वाकी बुद्रुक : पुणे - नाशिक महामार्गावरील हॉटेल सागर येथे हॉटेलच्या व्यवस्थापकास आणि कुक यास मारहाण केल्याच्या रागातून हॉटेल मालकाने तरुणाचा खून केला आहे.  तर दुसऱ्याच्या अंगावर चारचाकी मोटार घालून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदरचा प्रकार चाकण जवळील वाकी खुर्द (ता. खेड) येथे भामा नदीच्या पुलावर घडला आहे.

हेमंत संतोष सुतार (रा. लादवड, ता. खेड, जि. पुणे) असे तलवार हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुरज विठ्ठल वाळूज (वय २८, रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड) असे मोटारीचे चाक पायावरून गेल्याने गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जखमी सुरज वाळुंज याच्या फिर्यादीवरून वाकी खुर्द येथील हॉटेल सागरचा मालक ऋतिक वहिले याच्यासह मयूर येवले यांच्यावर मंगळवारी १० ऑगस्ट २०२१ रोजी खुनाचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Pune: A youth was killed in a minor dispute with a hotel owner on Nashik Highway