पुण्यात एका महिलेला ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम पडला साडेचार लाखांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 14:15 IST2021-11-07T14:15:33+5:302021-11-07T14:15:40+5:30
उघड्या दरवाजातून प्रवेश करुन चोरट्याने पळवले पूजेला ठेवलेले दागिने

पुण्यात एका महिलेला ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम पडला साडेचार लाखांना
पुणे : धनकवडी येथील गणेशनगरमध्ये दरवाजा उघडा ठेवून दिवाळी पहाट कार्यक्रमाला जाणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. सकाळच्या वेळी उघड्या दरवाजातून प्रवेश करुन लक्ष्मीपूजनासाठी देवघरात ठेवलेले साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी अभिजित मुजुमले यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
धनकवडीतील गणेशनगरमध्ये शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. फिर्यादी हे पहिल्या मजल्यावर राहतात. त्यांनी लक्ष्मीपूजनासाठी देवघरात १८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख ठेवले होते. त्यांची पत्नी सकाळी उठून दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी गेली. जाताना तिने दरवाजा उघडा ठेवला होता. चोरट्याने उघड्या दरवाजातून आत प्रवेश करुन देवघरातील साडेचार लाख रुपयांचे दागिने व १० हजार रुपये रोख असा ऐवज चोरुन नेला. सहकारनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.