शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागात पुण्याचीच बाजी; जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८७ टक्के निकाल, नगरचा निकाल ८६.३४ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:25 IST

राज्याच्या एकूण निकालाचा विभागनिहाय विचार करता पुणे विभाग सहाव्या स्थानी आहे, गतवर्षी पुणे विभागाने तिसरे स्थान पटकावले होते

पुणे: बारावीच्या निकालात पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यानेच बाजी मारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट हाेत आहे. पुणे विभागाचा एकत्रित निकाल ९१.३२ टक्के लागला असून, यात पुणे जिल्हा सर्वाधिक ९४.८७ टक्के, तर त्याखालाेखाल सोलापूर जिल्हा ८८.६२ टक्के आणि सर्वात कमी अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ८६.३४ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पुणे विभागाच्या निकालात यंदा ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

पुणे विभागात एकूण २ लाख ४४ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. यापैकी २ लाख ४२ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. त्यातील २ लाख २१ हजार ६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला होता. यंदाचा निकाल ९१.३२ टक्के लागला आहे. गतवर्षीही पुणे जिल्हा अव्वल स्थानी होता.

गतवर्षी पुणे जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.८८ टक्के लागला होता. यावरून विभागातील तिन्ही जिल्ह्यांच्या निकालात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गैरमार्ग प्रकरणांची संख्या घटल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. गतवर्षी ९५ प्रकरणांची नोंद झाली हाेती, ती यंदा ६६ वर आली आहे.

राज्याच्या तुलनेत विभागाची घसरण 

राज्याच्या एकूण निकालाचा विभागनिहाय विचार करता पुणे विभाग सहाव्या स्थानी आहे. गतवर्षी पुणे विभागाने तिसरे स्थान पटकावले होते. दरवर्षीच्या निकालात कोकण विभाग प्रथम स्थानावर असतो. पुणे विभागात येणाऱ्या तिन्ही जिल्ह्याचा निकाल यंदा घटला आहे.

जिल्हानिहाय चित्र

१) पुणे : पुणे जिल्ह्यात यंदा बारावीसाठी १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. त्यातील १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे.

२) अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात ६१ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ६० हजार ९३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. त्यातील ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ८६.३४ इतकी आहे.

३) साेलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा बारावी परीक्षेसाठी एकूण ५४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली हाेती. त्यापैकी ५४ हजार ३५३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले हाेते. त्यातील ४८ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची एकूण टक्केवारी ८८.३२ इतकी आहे.

मुला-मुलींचे प्रमाण काय?

- पुणे जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.७४ टक्के, तर मुलांचा निकाल ९३.१५ टक्के लागला.- अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९२.५१ टक्के, तर मुलांचा निकाल ८१.४० टक्के लागला.- सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.६२ टक्के, तर मुलांचा निकाल ८४.६४ टक्के लागला.

शाखानिहाय स्थिती

- विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९७.०१ टक्के- वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.३२ टक्के- कला शाखेचा एकूण निकाल ७४.२४ टक्के- व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल ८४.१५ टक्के- तंत्रविज्ञान शाखेचा निकाल ७२.०३ टक्के

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकालEducationशिक्षणStudentविद्यार्थीSolapurसोलापूरAhilyanagarअहिल्यानगर