पुणे : शहरात पाणीपुरवठा विभागातील व्हॉल्व्ह सोडणाऱ्या चावीवाल्याची चलाखी बंद करण्यासाठी शहरात स्वयंचलित ३०० व्हॉल्व्ह बसविले जाणार आहेत; पण हे काम संथगतीने सुरू आहे. हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात समान पाणी योजनेचे काम सुरू आहे. त्यामध्ये व्हॉल्व्ह फिरवण्यासाठी ‘ॲक्च्युएटर’ या तंत्रज्ञानाचा वापर करून १२५ पाण्याच्या टाक्यांवर ३०० व्हॉल्व्ह बसविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.‘ॲक्च्युएटर’ हे तंत्रज्ञान स्काडा प्रणालीला जोडले गेल्याने पाणी सोडण्याची आणि बंद करण्याची वेळ निश्चित केल्यानंतर रिमोटद्वारे पाणीपुरवठ्यावर नियंत्रण केले जाईल. एखाद्या भागात पाण्याचा दाब कमी ठेवायचा की जास्त करायचा हे देखील ऑनलाइन करता येणार आहे. विमाननगर, बाणेर-बालेवाडी परिसरातील टाक्यांवर हे व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत; पण उर्वरित टाक्यांवर अद्याप व्हॉल्व्ह बसविण्यात आलेले नाहीत.पाण्याच्या टाक्यांची कामे अर्धवट ठेवल्याचा फटका समान पाणीपुरवठा योजनेचे ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत; पण शेवटच्या टप्प्यातील जलवाहिनी मुख्य जलवाहिनीला जोडणे, पाण्याच्या टाकीपर्यंत जलवाहिनी टाकण्यासाठी जागा न मिळणे, व्हॉल्व्ह न बसविणे अशी कामे अर्धवट आहेत. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी होत नाही. त्याचा फटका नागरिकांना बसत असून, टँकरचालकांचा फायदा होत आहे.
Pune Water Supply : शहरात पाण्याचे स्वयंचलित ३०० व्हॉल्व्ह बसविण्याचे काम संथगतीने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:39 IST