शहराच्या अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत; कर्वनगर, रामटेकडी येथे जलवाहिनी फुटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 15:34 IST2025-12-27T15:34:05+5:302025-12-27T15:34:44+5:30
कर्वेनगरनंतर रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पम्पिंग लाईन अचानक फुटल्याने दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे.

शहराच्या अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत; कर्वनगर, रामटेकडी येथे जलवाहिनी फुटली
पुणे :पुणे शहरातील खडकवासला ते वारजे आणि होळकर ही पाणीपुरवठा जलवाहिनी कर्वेनगर येथे फुटली. महापालिका प्रशासन तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. त्यामुळे कर्वेनगर, प्रभात रोड, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, औंध, चिकलवाडी, खडकी आणि शिवाजीनगर या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
कर्वेनगरनंतर रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पम्पिंग लाईन अचानक फुटल्याने दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. त्यामुळे रामटेकडी टाकीच्या अखत्यारीतील भागाचा शनिवारपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संपूर्ण हडपसर, हडपसर गावठाण, ससाणे नगर, रेल्वे लाइन कडेचा भाग, मंत्री मार्केट, गंगा रेसिडेन्सी, साईनाथ वसाहत, गाडीतळ, चिंतामणी नगर, सय्यदनगर, हडपसर इंड्रस्ट्रीयल इस्टेट, शिंदेवस्ती, भीमनगर, संपूर्ण रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदुवाडी, आनंदनगर, एसआरपीएफ महंमदवाडी गाव, तरवडे वस्ती, कृष्णानगर, सातवनगर, राजीव गांधीनगर, दोराबजी पॅराडाइज, कडनगर बूस्टरवरील भाग, तुकाई दर्शन टाकी- सातववाडी, गोंधळेनगर, उन्नतीनगर व काळेपडळ, हडपसर- सोलापूर रोड डावी बाजू, साडेसतरा नळी, भोसले गार्डन, माळवाडी, मगरपट्टा सिटी, हडपसर आकाशवाणी, पिंगळेवस्ती, मुंढवा, केशवनगर, चिंतामणी नगर, हांडेवाडी रोड, सातवनगर, गुलामअली नगर, श्रीराम चौक परिसर, रामटेकडी, रामनगर परिसर अंतर्गत होणारा भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे.