पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळल्याच्या तक्रारी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:11 IST2026-01-23T09:10:32+5:302026-01-23T09:11:00+5:30

- २० कोटींची कामे करण्यास मान्यता

Pune Water pollution Complaints of drainage water being mixed with drinking water have increased. | पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळल्याच्या तक्रारी वाढल्या

पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळल्याच्या तक्रारी वाढल्या

पुणे : पिण्याच्या पाण्यात सांडपाणी येत असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत, या तक्रारी शहराच्या विविध भागांतून येत असल्याने तातडीने उपाययोजना करण्यासाठी २० कोटी २० लाखांची कामे करण्यास स्थायी समितीसह मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. यासाठी वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यासाठी टाकलेल्या जलवाहिन्यांमधून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी अनेकदा येतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सर्वेक्षण सुरू केले होते. यानुसार महापालिका जुन्या हद्दीत सर्वाधिक दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत. दाट लोकवस्ती, अरुंद गल्लीबोळात जुन्या ड्रेनेज लाइन व पाण्याच्या लाइन्स आहेत. अनेक ठिकाणी पाइपलाइन्स या खोलवर असून ड्रेनेज लाइन्स वरवर टाकण्यात आल्या आहेत. घुशींमुळे ड्रेनेज लाइन्सच्या चेंबर्समधून पाणी जमिनीत मुरते. पाण्याच्या लाइन्स जीर्ण झाल्याने मैलापाणी या लाइन्समधून जाते. काही ठिकाणी जागेअभावी सांडपाण्याच्या चेंबर्समधूनच पिण्याच्या पाण्याच्या लाइन्स नेण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी २० कोटी २० लाखांची कामे करण्यास स्थायी समितीसह मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. दरम्यान, कोंढवा, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, हडपसर, कात्रज येथील संतोषनगर, अंजनीनगर या भागांत काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशासनाने या ठिकाणी दुरुस्तीची कामे देखील सुरू केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी दिली. 

Web Title : पुणे में पीने के पानी में सीवेज दूषित होने की शिकायतें बढ़ीं

Web Summary : पुणे में पीने के पानी में सीवेज मिलने की बढ़ती शिकायतों का सामना करना पड़ रहा है। पुराने पाइपलाइन, घनी आबादी और अपर्याप्त बुनियादी ढांचे को दोषी ठहराया जा रहा है। शहर निगम ने कोंढवा और हडपसर जैसे प्रभावित क्षेत्रों में तत्काल मरम्मत के लिए ₹20.2 मिलियन मंजूर किए हैं।

Web Title : Sewage Contamination Complaints in Drinking Water Rise in Pune

Web Summary : Pune faces increasing complaints of sewage mixing in drinking water. Old pipelines, dense populations, and inadequate infrastructure are blamed. The city corporation has approved ₹20.2 million for urgent repairs in affected areas like Kondhwa and Hadapsar to fix the issue and ensure clean water supply.