Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:48 IST2025-07-28T12:46:34+5:302025-07-28T12:48:30+5:30

Pune Couple Viral Video: रस्त्यावरून जाताना एका कपलने दुचाकीवरच अश्लील चाळे सुरू केले. एका दुचाकीस्वाराने त्यांचा व्हिडीओ बनवला असून, हा  व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Pune Video: Shame on you! Couple in Pune having sex on a bike; Video goes viral | Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 

Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 

Pune Couple Viral Video News: बाई काय हा प्रकार... पुण्यातील जोडप्याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ बघून तुम्हीही हेच म्हणाल. दुचाकीवरून प्रवास करत असताना या जोडप्याने रोमान्सच्या नावाखाली जीव धोक्यात घालून अश्लील चाळेच सुरू केले. महिला दुचाकीच्या टाकीवर बसलेली आहे आणि पुरूष दुचाकी चालवतोय. भरधाव दुचाकीवरच महिलेचा थिल्लरपणा सुरू होतो. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील प्रकार पुण्यातील शिंदेवाडी भागात घडला आहे. खेड-शिवापूर परिसरातील रस्त्यावर जोडप्याचे भररस्त्यावर हे चाळे सुरू होते. 

महिलेचे पेट्रोलच्या टाकीवर बसून चाळे

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पुरूष गाडी चालवत आहे. दुचाकीच्या टाकीवर महिला पुरुषाकडे तोंड करून बसलेली आहे. 

रस्त्यावरून जात असताना या जोडप्याचे अश्लील चाळे सुरू होतात. महिला आधी टाकीवर झोपते. त्यानंतर ती पुरूषाच्या गळ्यात पडताना दिसते. आणि त्याला मिठ्या मारताना दिसत आहे. महिलेने तोंडावर मास्क लावलेला आहे. 

पुण्यात जोडप्याचे अश्लील चाळे, व्हिडीओ पहा

पाठीमागून येत असलेल्या एका दुचाकीस्वाराचे जा जोडप्याकडे लक्ष गेले. त्याने त्यांचा व्हिडीओ शूट केला. बरेच अंतर पुढे जाईपर्यंत या जोडप्याचे दुचाकीवर अश्लील चाळे सुरूच होते. 

वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर जीव धोक्यात घालून अशा प्रकारे कृत्य करणाऱ्या जोडप्याबद्दल सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहे. हे अति प्रेम आहे की प्रेमाच्या नावावर अश्लिलता, असा प्रश्नही काहीजणांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: Pune Video: Shame on you! Couple in Pune having sex on a bike; Video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.