शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ कलावंतांकडून ‘रंग यात्रा’ ॲपच्या विरोधात आंदोलन

By श्रीकिशन काळे | Updated: March 16, 2025 16:27 IST

महापालिकेच्या ऑनलाइन बुकिंगला विरोध : विविध संस्था, कलावंतांकडून निषेध

पुणे : शहरातील नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रामधील ऑनलाइन बुकिंगसाठी ‘रंग यात्रा’ या मोबाईल ॲपचा विरोध करण्यासाठी रविवारी (दि.१६) अनेक कलावंत एकत्र आले होते. त्यांनी बालगंधर्व रंगमंदिरासमोर या ॲपचा तीव्र निषेध व्यक्त करून ते रद्द करण्याची मागणी केली. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, भाग्यश्री देसाई आदी सहभागी झाले होते.

पुणे महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक केंद्र विभागाच्या वतीने नाट्यगृह आणि सांस्कृतिक केंद्रामधील ऑनलाइन बुकिंगसाठी ‘रंग यात्रा’ हे मोबाइल ॲप तयार केले. पण या ऑनलाइन बुकिंग ॲपला शहरातील विविध संस्थांनी तीव्र विरोध केला. कोणाशीही चर्चा न करताच पालिकेने ॲप तयार केले असल्याने ते आम्हाला अमान्य आहे आणि ते त्वरीत रद्द करावे, अशी मागणी ज्येष्ठ कलावंतांनी केली. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, भाग्यश्री देसाई, बाबासाहेब पाटील, मेघराज राजेभोसले, सुनील महाजन, समीर हम्पी, सत्यजित दांडेकर, योगेश सुपेकर, सुरेखा पुणेकर, ऋषिकेश बालगुडे, शशिकांत कोठावळे, नाना मोहिते, जतीन पांडे, मोहन कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.

या ॲपमुळे नाटक व्यवस्थापक, निर्माते, कलाकार, लावणी निर्माते, व्यवस्थापक, या सर्वांच्या दृष्टीकोनातून ऑनलाइन बुकिंग अव्यवहार्य ठरणार आहे. ऑनलाइन बुकिंग करत असताना हजारोंच्या घरात जर नाट्यगृहासाठी अर्ज आले, तर कुठल्याही नाट्यगृहाच्या बॅक ऑफिसला हुशार, अनुभवी, सक्षम टीम नाही. त्यामुळे गोंधळ वाढेल, असा आरोप उपस्थितांनी केला.सध्या नाट्यगृहांमध्ये इंटरनेट किंवा वायफायची सुविधा देखील अद्याप नाही, मग एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन बुकिंग केलेल्या संस्थांचे वाटप कसे करणार? ऑनलाइन बुकिंग करताना मोठमोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या पैशांच्या जोरावर सर्व बुकिंग अगोदरच करून ठेवतील. त्यामुळे इतर नाट्यसंस्था किंवा कलाकारांना बुकिंग करणे अवघड जाईल, अशी कलावंतांची व्यथा आहे.

पुणे महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये नाटकं होणं अपेक्षित आहे. पण तीन जे प्रमुख नाट्यगृहे आहेत, त्यामध्ये नाटकं न होता इतरच खासगी कार्यक्रम होत असतात. आज रंगभूमीवर ६०-७० नाटक आहेत आणि सर्वच नाटकांना या तीन रंगभूमीवर नाटक सादर करायची इच्छा असते. पुणे पालिकेने आणलेले रंगयात्रा नावाचे ॲप नाट्यगृह आरक्षणासाठी आहे. ते सर्वांना वापरता येईल. मग जर एखाद्याने संपूर्ण दिवसभर ते बूक केले तर नाटकवाल्यांनी जायचे कुठे ? याचा पालिकेेने विचार करावा. - प्रशांत दामले, ज्येष्ठ नाट्यकर्मी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर