शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

पुणे : आनंद सोहळ्याची उद्या वैभवी सांगता, तयारीत कार्यकर्ते मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:33 IST

गणरायाची उत्सवात पूजाअर्चा करून आता त्याला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते झटू लागले असून शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील ही विसर्जन मिरवणूक अधिक जल्लोषपूर्ण व वैभवी व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे़

पुणे : गणरायाची उत्सवात पूजाअर्चा करून आता त्याला निरोप देण्यासाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते झटू लागले असून शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील ही विसर्जन मिरवणूक अधिक जल्लोषपूर्ण व वैभवी व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे.विसर्जन मिरवणुकीसाठी मानाच्या गणपतींबरोबरच प्रसिद्ध गणेश मंडळाचे रथ सज्ज होऊ लागले आहेत़ गणेश मंडळाचे कार्यकर्ते पुण्याचे वैभव म्हणून ओळखल्या जाणा-या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला लागले आहेत.कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या पाच मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता टिळक पुतळा येथून सुरू होईल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते पाचही गणपतींची आरती करण्यात येईल. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. ढोल-ताशा व बँड पथकांच्या निनादात गणरायाला निरोप दिला जाणार आहे.मानाचा पहिला-कसबा गणपतीकसबा गणपती मंडळाच्या ‘श्रीं’ची आरती सकाळी नऊ वाजता मूर्तिकार मंडळाच्या मंडपात केली जाईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता टिळक पुतळा येथून मुख्य मिरवणुकीस सुरुवात होईल. कामायनी मंदिर बँड पथक तसेच रमणबाग ढोल-ताशा पथक मिरवणुकीमध्ये असेल. त्याचप्रमाणे आर्ट आॅफ लिव्हिंग, रोटरी क्लबच्या पथकासह विदेशी नागरिकांचे दिंडी पथकही मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.मानाचा दुसरातांबडी जोगेश्वरी गणपतीतांबडी जोगेश्वरी मंडळाच्या ‘श्रीं’ची आरती मंडपामध्येच मंगळवारी सकाळी ९ वाजता होईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होईल. मिरवणुकीत गंधर्व बँड व शिवमुद्रा, ताल, शौर्य या ढोल-ताशा पथकाचा समावेश असेल. त्याचप्रमाणे सतीश आढाव यांचे नगारावादन होईल. मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी होतील. तसेच घोड्यावर स्वार झालेल्या महिला व मुली हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य असेल.मानाचा तिसरागुरुजी तालीम गणपतीगुरुजी तालीम मंडळाच्या ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक सरपाले बंधू यांनी फुलांच्या सहाय्याने साकारलेल्या पारंपरिक वाद्यांच्या संगीतमय रथातून सकाळी साडेदहा वाजता निघेल. बेलबाग चौकात पोलीस आयुक्तांच्या हस्ते आरती केली जाईल. शिवगर्जना पथक, नादब्रह्म पथक व चेतक ढोल ताशा पथक यंदा मिरवणुकीत असतील. तसेच नगारावादन हे वैशिष्ट्य असेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुकीत उच्च प्रतीचा गुलालाचा कमी प्रमाणात वापर केला जाईल.मानाचा चौथातुळशीबाग गणपतीतुळशीबाग गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी साकार केलेल्या गरुड रथातून काढली जाणार आहे. फुलांनी सजवलेल्या या गरुड रथातून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे़ यंदा मिरवणुकीत गजलक्ष्मी ढोल पथक, स्वरुपवर्धिनी ध्वज पथक आणि हिंद तरुण मंडळाचे गावठी ताल पथक ही तीन पथके असतील.मानाचा पाचवाकेसरीवाडा गणपतीकेसरीवाडा या मानाच्या पाचव्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात होईल. मिरवणुकीत प्रताप बिडवे यांचे सनई चौघडावादन, श्रीराम, शिवमुद्रा ढोल ताशा पथक असणार आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवPuneपुणे