पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक; वाहन चालकांचा जागीच मुत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 17:18 IST2021-07-18T17:17:36+5:302021-07-18T17:18:23+5:30
घटना शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली

पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक; वाहन चालकांचा जागीच मुत्यू
राजगुरुनगर : पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर थिगळस्थळ (ता खेड ) येथे दोन वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहन चालकांचा जागीच मुत्यू झाला आहे. हि घटना शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रदिप शिवाजी बरकडे (वय २१ )रा. कंळब नांदुर (ता आंबेगाव ) दुसऱ्या मृत्यू चालकाचे नांव समजू शकले नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पो केबलचे बंडल घेऊन पुण्याकडून नाशिक बाजुकडे जात होता. दरम्यान नारायणगाव येथून भाजीपाला घेऊन पिकअप येत होती. थिगळ स्थळ येथे चासकमानधरणाच्या डाव्या कालव्या शेजारी या दोन्ही वाहनाची समोरा जोरदार धडक झाली. या अपघातात पिकअप चालक प्रदिप बरकडे व गुजरात येथील टेम्पो चालक हे दोघे जण जागीच ठार झाले.
या घटनेत दोन्ही वाहनांचा चक्काचुर झाला आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने टेम्पोमधील केबलचे बंडल रस्त्यावर पडले, तसेच पिकमधील भाजीपाला रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजुला केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत भोसले करत आहे.