ट्रिपलसीट जाताय, सावधान..! शहरात वाहतूक विभागाकडून १४५४ वाहनांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:41 IST2026-02-11T16:39:19+5:302026-02-11T16:41:14+5:30

- याशिवाय २१४४ चलन पेड करून १६ लक्ष १८ हजार ४०० रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत.

Pune Triple seat is coming, be careful Traffic department takes action against 1454 vehicles in the city | ट्रिपलसीट जाताय, सावधान..! शहरात वाहतूक विभागाकडून १४५४ वाहनांवर कारवाई

ट्रिपलसीट जाताय, सावधान..! शहरात वाहतूक विभागाकडून १४५४ वाहनांवर कारवाई

पुणे : रस्त्यावरून बेधडकपणे ट्रिपलसीट जाणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पुणे शहरातील विविध प्रमुख रस्ते, चौक व वाहतूक दाटीच्या ठिकाणी एकूण १४५४ ट्रिपलसीट वाहनांवर कारवाई केली आहे. याशिवाय २१४४ चलन पेड करून १६ लक्ष १८ हजार ४०० रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत.

वाहतूक पोलिसांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार व सहपोलीस आयुक्त व अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील रस्त्यांवर ट्रिपलसीट वाहनांवर कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. एकूण ५९२१ जणांवर चलन कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये पुणे शहर वाहतूक विभागातील ३० वाहतूक विभाग तसेच ४४ पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या मोहिमेंतर्गत दुचाकी वाहनावर ट्रिपलसीटने प्रवास करणे हे कायद्याने गुन्हा आहे, ट्रिपलसीटमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते व स्वतःसह इतर रस्ते वापरकर्त्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, सुरक्षित व शिस्तबद्ध वाहनचालना करावी, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहेत. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title : पुणे पुलिस की ट्रिपल राइडिंग पर कार्रवाई: 1454 वाहनों पर जुर्माना

Web Summary : पुणे यातायात पुलिस ने विशेष अभियान में ट्रिपल राइडिंग करने वाले 1454 वाहनों पर जुर्माना लगाया। ₹16.18 लाख का जुर्माना वसूला गया। पुलिस नागरिकों से सुरक्षा के लिए यातायात नियमों का पालन करने और दुर्घटनाओं को रोकने का आग्रह करती है। ऐसे अभियान जारी रहेंगे।

Web Title : Pune Police Crackdown on Triple Riding: 1454 Vehicles Fined

Web Summary : Pune traffic police fined 1454 vehicles for triple riding during a special drive. ₹16.18 lakh in fines were collected. The police urge citizens to follow traffic rules for safety and prevent accidents. Such drives will continue.