Pune Traffic: पुणेकरांनो, उद्या दुपारी १२ ते ४ शहरातील हे प्रमुख रस्ते राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:38 IST2026-01-22T17:23:18+5:302026-01-22T17:38:35+5:30
Pune Traffic Advisory in Marathi: पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेनिमित्त उद्या दिनांक २३ जानेवारी २०२६ मोठ्या प्रमाणात शहरातील वाहतुकीत बदल; महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुटी

Pune Traffic: पुणेकरांनो, उद्या दुपारी १२ ते ४ शहरातील हे प्रमुख रस्ते राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते?
Pune Traffic Update:पुणे ग्रँड टूर स्टेज ४ सायकल स्पर्धा उद्या दिनांक २३ जानेवारी २०२६ (शुक्रवारी) शहरातील ५८ किलोमीटरच्या मार्गावरून जाणार असल्याने पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल केले आहेत. तसेच या स्पर्धेनिमित्त पुणे महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
आजची स्पर्धा पिंपरी-चिंचवड येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथून सुरू होणार असून पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बालगंधर्व रंगमंदिर येथे स्पर्घेचा शेवट होणार आहे. ९५ किमी ची असलेली ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी स्पर्धेच्या मार्गावर कोणतेही वाहन उभे करू नयेत. स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या बॅरिकेड्स व स्टॉपलाइनच्या पाठीमागे थांबून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे. तसेच या स्पर्धेमुळे शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता पुणे महापालिका हद्दीतील सरकारी व खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
या स्पर्धेसाठी १२ पोलिस उपायुक्त, १९ सहायक पोलिस आयुक्त, ७८ पोलिस निरीक्षक, २४३ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासह ४ हजार ३८१ पोलिस अंमलदार असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हे रस्ते दुपारी १२ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत राहणार बंद...
१) राधा चौक ते सुसखिंड रोड (बंगळुरू हायवे सर्व्हिस रोड)
२) पूनम बेकरी ते पाषाण सुस रोडने पाषाण सर्कल
३) पाषाण सर्कल ते एनसीएल ते अभिमान श्री सोसायटी ते पुणे विद्यापीठ चौक
४) पुणे विद्यापीठ ते ब्रेमन चौक ते राजीव गांधी ब्रीज
५) राजीव गांधी ब्रीज ते ब्रेमन चौक ते पुणे विद्यापीठ चौक ते एस. बी. जंक्शन चौक
६) एस. बी. जंक्शन ते जे. डब्ल्यु. मेरिएट हॉटेल ते बालभारती ते पत्रकार भवन (एस. बी. रोड)
७) पत्रकार भवन ते लॉ कॉलेज रोड ते प्रभात रोड ते शेलार मामा चौक कर्वे रोड
८) शेलार मामा चौक ते नळ स्टॉप ते पौड फाटा ते कर्वे पुतळा (कर्वे रोड)
९) कर्वे पुतळा ते डी पी रोड ते सुतार हॉस्पिटल रोड ते वनाज पौड रोड
१०) वनाझ पौड रोड ते नळ स्टॉप चौक
११) नळ स्टॉप चौक ते म्हात्रे ब्रिज ते सेनादत्त पोलिस चौकी
१२) सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक (शास्त्री रोड)
१३) टिळक चौक ते पुरम चौक
१४) टिळक चौक ते शनिपार चौक ते ए बी सी चौक (बाजीराव रोड)
१५) ए बी सी चौक ते हुतात्मा चौक दगडू शेठ हलवाई गणपती ते मंडई चौक ते खडक पोलिस स्टेशन ते राष्ट्रभूषण चौक
१६) राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक ते ना सी फडके चौक
१७) ना सी फडके चौक ते निलायम थिएटर ते सावरकर चौक सारसबाग
१८) सावरकर चौक ते मित्रमंडळ चौक ते लक्ष्मीनारायण चौक ते महाराष्ट्र मित्र मंडळ (डायस प्लॉट) चौक
१९) महाराष्ट्र मित्र मंडळ ते सेव्हन लव्हज चौक ते टिंबर मार्केट ते ए डी कँम्प चौक ते नरपतगिरी चौक
२०) नरपतगिरी चौक ते बॅनर्जी चौक ते नेहरू मेमोरियल चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक
२१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते एम जी रोड महावीर चौक ते इंदिरा गांधी चौक ते अर्जुन रोड
२२) अर्जुन रोड ते नॅशनल वॉर मेमोरियल ते घोरपडी रोड जंक्शन
२३) घोरपडी जंक्शन ते साधू वासवानी चौक ते बोल्हाई चौक
२४) बोल्हाई चौक ते अपोलो टॉकीज ते दारूवाला पूल ते लाल महल चौक
२५) लाल महल ते शनिवार वाडा ते स. गो. बर्वे चौक
२६) स. गो. बर्वे चौक ते शिमला ऑफिस चौक ते न. ता. वाडी चौक
२७) न. ता. वाडी चौक ते चाफेकर चौक ते ज्ञानेश्वर पाटुका चौक ते तुकाराम पादुका चौक ते गुडलक चौक ते गरवारे चौक
२८) गरवारे चौक ते बालगंधर्व चौक
२९) बालगंधर्व चौक परिसर (समाप्त)
या रस्त्यांना जोडणारे उपरस्ते देखील या वेळेत बंद राहणार असून, नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा अवलंब करावा अन्यथा मेट्रोचा वापर करावा असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेचा समारोप बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार असल्याने जंगली महाराज रोड स्पर्धेचा कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांनी पूर्वनियोजन करून दैनंदिन कामकाजाचे नियोजन स्पर्धेच्या वेळेपूर्वी अथवा त्यानंतर करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.