Pune: पिंपळसूटी येथे बांधाऱ्यावरून ट्रकटर घोड नदीत कोळसळा, अल्पवयीना मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 22:43 IST2025-10-04T22:42:25+5:302025-10-04T22:43:12+5:30
Pune Accident News: शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे ट्रकटर बंधाऱ्यावरून घोड नदीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज दुपारी घडली. यात अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून, चालक बचावला आहे.

Pune: पिंपळसूटी येथे बांधाऱ्यावरून ट्रकटर घोड नदीत कोळसळा, अल्पवयीना मुलाचा मृत्यू
शिरूर - तालुक्यातील पिंपळसूटी येथे ट्रकटर बंधाऱ्यावरून घोड नदीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज दुपारी घडली. यात अल्पवयीन् मुलाचा मृत्यू झाला असून चालक बचावला आहे.
शुभम राजू धायगुडे (वय 14,रा. हंगेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अ. नगर) असे या अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. तर चालक मृत मुलाचे चुलते धायगुडे साहेबराव धायगुडे (40, रा.हंगेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अ. नगर ) हे या अपघातात बचावले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आज शनिवारी (दि. 4) दुपारी 12 वाजेच्या दरम्यान भानुदास धायगुडे हे ट्रकटर घेऊन हंगेवाडी येथून पिंपळसुटी कडे येत होते. ट्रकटर मध्ये त्यांचा वर त्यांचा पुतण्या शुभम हा बसला होता. ट्रकटर येथील घोड नदीवरील अरुंद कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रकटर दुथडी भरून वाहत असलेल्या घोड नदीत कोसळला. पाण्याचा वेग जास्त असल्याने जखमी भानुदस् घायगुडे हे काही अंतरावर पोहून बाहेर निघाले. मात्र शुभम हा ट्रकटर च्या मड गार्ड मध्ये अडकून ट्रकटर बरोबर नदी तळाला गेला होता. घटनेची माहिती मिळताच पिपंळसूटी, शिरसगाव, हंगेवाडी, कोळपे मळा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिक नदीकिनाऱ्याने शुभम याला शोधत होते. तर काही नागरिक व लोक प्रतिनिधी यांनी घोडधरण पाटबंधारे विभागाकडे विनंती करत काही काळ धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याची विनंती केली. तीन तासांनी पाणी बंद होताच क्रेनच्या सहाय्याने ट्रकटर बाहेर काढण्यात आला यावेळी ट्रकटर मध्ये अडकलेला शुभमचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलीस स्टेशनला आक्स्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
अरुंद बांधाऱ्याने घेतला जीव
पिंपळसूटी ते हंगेवाडी दरम्यान अनेक वर्षनपासून पुलाची मागणी होत आहे. या भागात पुणे व अहिल्यानगर जिल्हाला जोडणारा येथे केवळ अरुंद कोल्हापूर पद्धतीचा बांधरा आहे. येथे नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या अरुंद कोल्हापूर पद्धतीच्या बांधाऱ्यानेच या मुलाचा जीव घेतल्याचे नागरीक बोलत आहेत.