सलग चाैथ्या दिवशीही पुण्याहून दुबई, अबुधाबी विमानसेवा रद्द; युद्धजन्य परिस्थितीचा प्रवाशांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:05 IST2026-03-03T15:04:59+5:302026-03-03T15:05:15+5:30

युद्धजन्य परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर विमानसेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांनी खात्री करूनच तिकीट काढावी, असे आवाहन विमान कंपन्यांकडून करण्यात आले आहे

Pune to Dubai, Abu Dhabi flights cancelled for fourth consecutive day; War-like situation hits passengers | सलग चाैथ्या दिवशीही पुण्याहून दुबई, अबुधाबी विमानसेवा रद्द; युद्धजन्य परिस्थितीचा प्रवाशांना फटका

सलग चाैथ्या दिवशीही पुण्याहून दुबई, अबुधाबी विमानसेवा रद्द; युद्धजन्य परिस्थितीचा प्रवाशांना फटका

पुणे : मध्य पूर्व आशिया देशात सुरू झालेल्या युद्धामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबी, दुबईसाठी होणारी चार आंतरराष्ट्रीय उड्डाणे मंगळवारी (दि. ३) रोजी रद्द करण्यात आली. त्यामुळे पुण्याहून दुबई, अबुधाबी जाणाऱ्या प्रवाशांची नियोजित कामे रखडली. युद्धजन्य परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी खात्री करूनच तिकीट काढावी, असे आवाहन विमान कंपन्यांकडून करण्यात आले आहे.

इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अचानक तणावपूर्ण परिस्थितीमुळे पुण्यासह संपूर्ण देशभरातून मध्य पूर्व भागात जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे मंगळवारी पुण्यातून अबुधाबी आणि दुबईला जाणाऱ्या चार विमाने रद्द करण्यात आली. यामध्ये स्पाइस जेट कंपनीचे (फ्लाइट क्रमांक - एसजी ५१) पुणे ते दुबई, रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी होणारे उड्डाण रद्द करण्यात आले. तसेच, एअर इंडिया एक्स्प्रेसचे (फ्लाइट क्र. आयएक्स २८३) पुणे ते अबुधाबी, रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी होणाऱ्या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. याशिवाय इंडिगो (फ्लाइट क्र. ६ ई १४८४/१४८३ दुबई - पुणे - दुबई, रात्री १०:३० वाजता येणारी आणि जाणारी विमाने रद्द करण्यात आली आहेत.

Web Title : युद्ध के कारण पुणे-दुबई, अबू धाबी उड़ानें चौथे दिन भी रद्द

Web Summary : मध्य पूर्व में तनाव के कारण पुणे से दुबई और अबू धाबी की उड़ानें लगातार चौथे दिन रद्द रहीं। युद्ध की स्थिति के कारण यात्रियों को यात्रा से पहले एयरलाइंस से टिकट की पुष्टि करने की सलाह दी जाती है। स्पाइसजेट, एयर इंडिया एक्सप्रेस और इंडिगो की उड़ानें प्रभावित हैं।

Web Title : Pune-Dubai, Abu Dhabi flights cancelled for 4th day due to conflict.

Web Summary : For the fourth consecutive day, flights from Pune to Dubai and Abu Dhabi were cancelled due to Middle East tensions. Passengers are advised to confirm tickets with airlines before traveling due to the ongoing war situation. SpiceJet, Air India Express, and Indigo flights are affected.