शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

घरचा मानसिक ताण नडला, तरुण थेट विजेच्या खांबावर चढला..! नको तेच झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 19:38 IST

तो वारंवार "जर कोणी वर आलं, तर मी उडी टाकीन" अशी धमकी देत होता

राजगुरुनगर (ता. खेड) – घरातील मानसिक ताण सहन न झाल्यामुळे आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विद्युत पोलवर चढलेल्या २२ वर्षीय तरुणाचा जीव पोलिस व ग्रामस्थांच्या सतर्कतेने वाचवण्यात यश आले. ही घटना आज दुपारी खेडजवळील निमगाव परिसरात घडली.अधिकच्या माहितीनुसार, संबंधित तरुण दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अमूल डेअरीजवळील विद्युत वाहक पोलवर चढला. त्यावेळी पोलवर विद्युत प्रवाह सुरू होता, त्यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. जवळपास दोन तास तो तरुण पोलवरच बसून होता. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ महावितरणला कळवून वीजपुरवठा बंद करून घेतला.पोलिस आणि ग्रामस्थांनी मिळून तरुणाला खाली यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो वारंवार "जर कोणी वर आलं, तर मी उडी टाकीन" अशी धमकी देत होता. पोलिस हवालदार मोहन अवघडे व इतर नागरिकांनी तातडीने पोलखाली जाळी धरून तरुणाच्या सुरक्षिततेची व्यवस्था केली.शेवटी, तरुणाने उडी घेतली, यावेळी खाली धरलेल्या जाळीत पडल्यामुळे त्याचा जीव वाचला. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून, पुढील वैद्यकीय आणि मानसिक उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड