रामटेकडी कब्रस्तानातून अर्भकाचे प्रेत गायब..! कोणी आणि का गायब केले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:23 IST2025-03-07T18:22:32+5:302025-03-07T18:23:46+5:30

कब्रस्तानमध्ये एक कबर उकरलेली असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ याबाबत इतरांना माहिती दिली असता

pune The body of an infant disappeared from the Ramtekdi cemetery Who disappeared it and why | रामटेकडी कब्रस्तानातून अर्भकाचे प्रेत गायब..! कोणी आणि का गायब केले ?

रामटेकडी कब्रस्तानातून अर्भकाचे प्रेत गायब..! कोणी आणि का गायब केले ?

पुणे - रामटेकडी येथील बागेनूर कब्रस्तानमध्ये दफन केलेल्या अर्भकाचे प्रेत गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महानगरपालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अर्भकाचे प्रेत नेमके कोणी आणि का गायब केले? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर सुरक्षानगर येथील नसीम नजीर शेख (वय ६५) यांच्या नात अफिसा अल्ताफ शेख (वय २०, रा. सांगोला, सोलापूर) हिची १ मार्च रोजी काशेवाडी येथील पालिकेच्या सोनवणे हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली. परंतु, जन्मत:च मृत असलेल्या बाळाला विधीवत रामटेकडी येथील बागेनूर कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले.  

घटनास्थळी नियमित नमाज पठनासाठी येणारे स्थानिक रहिवासी फारूक शेरू शेख यांनी ६ मार्च रोजी कब्रस्तानमध्ये एक कबर उकरलेली असल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ याबाबत इतरांना माहिती दिली असता दफन केलेले अर्भक गायब झाल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर नसीम शेख यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०१ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी दिली.  

दरम्यान, पुणे महानगरपालिकेने सर्व स्मशानभूमी आणि दफनभूमींमध्ये सुरक्षारक्षक नियुक्त केले असतानाही घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनाचा ढिसाळपणा समोर आला आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.  

 

Web Title: pune The body of an infant disappeared from the Ramtekdi cemetery Who disappeared it and why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.