पुणे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:10 IST2025-10-09T11:09:19+5:302025-10-09T11:10:08+5:30
दिवाळी अगोदर विविध आर्थिक मागण्या परिवहन विभागाकडून मान्य करण्यात याव्यात, यासाठी पुणे एसटी विभागीय कार्यालयासमोर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकरिता महाआरती व घंटानाद आंदोलन करण्यात आले.

पुणे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन
पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या २०१६ पासून अनेक आर्थिक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी वारंवार मागणी करूनही वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांपासून वाढीव भत्ता देखील मिळाला नाही.
दिवाळी अगोदर विविध आर्थिक मागण्या परिवहन विभागाकडून मान्य करण्यात याव्यात, यासाठी पुणे एसटी विभागीय कार्यालयासमोर कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकरिता महाआरती व घंटानाद आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, १३ तारखेला मुंबई येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर १४ तारखेपासून आंदोलनाचा इशारा एसटी कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे. यावेळी एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव दिलीप परब, मोहन जेधे, बाप्पू ढावरे, सागर दिघे, दीपक सावंत, महिला आघाडीच्या अश्विनी चिंचुरे, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.