पुणे शहरापेक्षा गावाकडची मुले हुश्शार..! दहावीच्या निकालात आंबेगाव तालुका अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:39 IST2025-05-14T08:38:39+5:302025-05-14T08:39:44+5:30
- मावळ दुसऱ्या तर वेल्हे तिसऱ्या स्थानी, मुलांपेक्षा मुली ठरल्या सरस

पुणे शहरापेक्षा गावाकडची मुले हुश्शार..! दहावीच्या निकालात आंबेगाव तालुका अव्वल
पुणे :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि. १३) दहावीचा निकाल जाहीर केला. त्यात पुणे विभागाचा निकाल ९४.८१ टक्के लागला. यात पुणे जिल्हा (९७.२६) अव्वल स्थानावर असून, त्याखालोखाल सोलापूर (९२.८३) आणि अहिल्यानगर (९१.८५) जिल्ह्याचा क्रमांक लागतो. त्यातही पुणे जिल्ह्याचा विचार करता टक्के लागला असून, या तालुक्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
दुसऱ्या स्थानी मावळ (९८.२२), तर तिसऱ्या स्थानी वेल्हे (९८.१६) तालुका आहे. यावरून जिल्ह्याचा ग्रामीण भाग सरस आंबेगाव तालुक्याचा निकाल ९८.५० ठरल्याचे दिसते. शहराचा पश्चिम भाग (९७.८३) सहाव्या, तर पूर्व भाग (९६.५६) चौदाव्या स्थानी आहे. शहरापेक्षा गावाकडची मुलं हुशार असल्याचे या निकालावरून दिसून येत आहे.
बारावीप्रमाणेच दहावीतदेखील मुलांपेक्षा मुली सरस ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यंदा दहावी परीक्षेत पुणे जिल्ह्यात एकूण १ लाख ३२ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ३२ हजार ४४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ लाख २८ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल ९७.२६ टक्के लागला आहे. यात उत्तीर्ण मुलांची संख्या ६६ हजार ५१९ असून, त्यांची टक्केवारी ९६.३८ आहे. मुलींची संख्या ६२ हजार २५९ असून, टक्केवारी ९८.२१ इतकी आहे. यामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का १.८३ टक्के अधिक आहे. गतवर्षी जिल्ह्याच्या एकूण निकालाचा टक्का ९५.८३ टक्के होता. त्यातही ९७.४५ मुली, तर ९४.३७टक्के मुले उत्तीर्ण झाली. तेंव्हाही मुलींनीच बाजी मारली होती.
१ लाख २८ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण
पुणे जिल्ह्यातून १ लाख ३२ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३२ हजार ४४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यातील १ लाख २८ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याचा टक्का २७.२६ इतका आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही दहावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.
तालुकानिहाय चित्र (मुलींचाच टक्का अधिक)
१. आंबेगाव
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
२८०५-२८००-२७५८-९८.५०
२. मावळ
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
५४१०-५३९४-५२९८-९८.२२
३. वेल्हे
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
५४८-५४४-५३४-९८.१६
४. पिंपरी चिंचवड
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
१९९१७-१९८६८-१९४६६-९७.९७
५. हवेली
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
१५४१७-१५३७१-१५०५६-९७.९५
६. पुणे सिटी (पश्चिम)
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
१८८१३-१८७४३-१८३३७-९७.८३
७. बारामती
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
६५७०-६५४४-६३८७-९७.६०
८. पुरंदर
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
३०९६-३०९३-३०१५-९७.४७
९. मुळशी
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
३४०९-३३८०-३२९१-९७.३६
१०. खेड
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
७६१३-७५९४-७३९१-९७.३२
११. शिरूर
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
६७४४-६७२४-६५४२-९७.२९
१२. भाेर
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
२१५९-२१५१-२०९२-९७.२५
१३. जुन्नर
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
४९५९-४९४३-४७८५-९६.८०
१४. पुणे (पूर्व)
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
२३५९८-२३५२०-२२७१२-९६.५६
१५. इंदापूर
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
६५६८-६५२२-६२६२-९६.०१
१६. दाैंड
नाेंदणी- प्रविष्ट- उत्तीर्ण-टक्के
५२९८-५२५६-४८९२-९३.०७