पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 05:22 IST2025-07-04T05:20:40+5:302025-07-04T05:22:35+5:30

कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची आरोपीने केली बतावणी

Pune shaken Young woman raped after entering house, photos taken on her own mobile phone; Computer engineer girl lived in an elite society | पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत

पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत

पुणे : कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत शिरलेल्या एकाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २) सायंकाळी घडली. कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी करून आरोपी सदनिकेत शिरल्याचे उघडकीस आले असून, पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत २५ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका २८ ते ३० वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिमंडळ ५चे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तरुणीने पोलिसांना केलेल्या आरोपीच्या वर्णनावरून त्याचा शाेध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता कल्याणीनगर येथील एका आयटी कंपनीत कामाला आहे. ती दोन वर्षांपासून शहरातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत भावासोबत राहते. घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती. त्यावेळी आरोपी सदनिकेजवळ आला. त्याने दरवाजा वाजवला.

तरुणीने सदनिकेचा दरवाजा (सेफ्टी डोअर) उघडला. तेव्हा त्याने कुरिअर कंपनीतील कामगार असल्याची बतावणी केली. तरुणीला बोलण्यात गुंतवून आरोपीने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. त्यानंतर तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला.

पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये तिचे छायाचित्र काढले आहे. मी परत येईन, असा मेसेज त्याने मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

Web Title: Pune shaken Young woman raped after entering house, photos taken on her own mobile phone; Computer engineer girl lived in an elite society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.