शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

पुणे ग्रामीण पोलीस आता अधिक ‘स्मार्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 02:17 IST

स्वतंत्र मोबाईल क्रमांक; नागरिकांचा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकद्वारे होणार संपर्क

बारामती : नुकतीच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे घेतलेल्या संदीप पाटील यांच्या संकल्पनेतून पुणे ग्रामीण पोलीस आता अधिक ‘स्मार्ट ’ बनणार आहे. त्यासाठी पाटील यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे, उपविभागाला स्वतंत्र मोबाईल क्रमांक पुरविला आहे. यावर इंटरनेट कायम सुरू राहणार असल्याने सर्वसामान्य नागरिक या मोबाईल क्रमांकांद्वारे व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून पोलिसांशी तातडीने संपर्क साधू शकणार आहे. त्यातून अडचणीत सापडलेल्या नागरिकांना पोलिसांच्या मदतीचा हात तातडीने मिळणार आहे.त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांशी आता सर्वसामान्यांच्या मोबाईलवरूनही संपर्क साधता येणार आहे. पोलीस अधीक्षक पाटील यांच्या अभिनव कल्पनेतून हा उपक्रम राबविला आहे. त्यामुळे पोलिसांशी व्हॉट्सअ‍ॅप, तसेच फेसबुकच्या माध्यमातून थेट संपर्क साधणे शक्य होणार आहे. तरुणाईसह सर्वच वयोगटांतील नागरिकांकडे इंटरनेटयुक्त मोबाईल आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांशी ‘कनेक्टिव्हिटी’ वाढविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.सोशल मीडियाद्वारे ‘लोकाभिमुख पोलिसिंग’हे मोबाईल क्रमांक चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत. सर्वसामान्य नागरिक त्यांच्या तक्रारीबाबतची माहिती, अन्य उपलब्ध होणारी उपयुक्त माहिती, फोटो, व्हिडिओ या मोबाईल क्रमांकांवर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पाठवू शकतात. सर्वसामान्य नागरिक या मोबाईल क्रमांकांवरून कॉल करूनसु्द्धा माहिती देऊ शकतात. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्याशी फेसबुक व टिष्ट्वटरच्या माध्यमातूनही संपर्क करू शकतात .याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पोलीस अधीक्षकांच्यावतीने पुरविण्यात आलेला मोबाईल कायम पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदाराकडे असणार आहे. शहरातील महत्त्वाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपशी ‘कनेक्टिव्हिटी’ राहणार आहे. बेकायदा, चुकीच्या बाबी पोलिसांपर्यंत पोहोचणार आहेत.पोलीस ठाणे व मोबाईल क्रमांक असेबारामती (एसडीपीओ) ९५५२२३०१००बारामती शहर - ९५५२२८७१००बारामती तालुका - ९५५२२९३१००इंदापूर - ९५५२२९८१००वालचंदनगर - ९५५२३६८१००भिगवण - ९५५२३८६१००वडगाव निंबाळकर - ९५५२३९७१००दौंड (एसडीपीओ) - ९५५२६३०१००दौंड - ९५५२६१२१००शिरुर - ९५५२६३४१००शिक्रापूर - ९५५२६५३१००यवत - ९५५२६५४१००रांजणगाव एमआयडीसी - ९५५२६७६१००भोर (एसडीपीओ) - ९५५२६५०१००जेजुरी - ९५५२६७८१००सासवड - ९५५२६८७१००राजगड - ९५५२६८९१००भोर - ९५५२५९३१००हवेली (एसडीपीओ) - ९५५२४८२१००हवेली - ९५५२७५३१००लोणी काळभोर - ९५५२७७८१००वेल्हा - ९५५२८१३१००लोणीकंद - ९५५२८९३१००खेड (एसडीपीओ) - ९५५२८९०१००खेड - ९५५२१९२१००घोडेगाव - ९५५२०९७१००मंचर - ९५५२०९४१००जुन्नर (एसडीपीओ) - ९५५२९५०१००जुन्नर - ९५५२१६४१००नारायणगाव - ९५५२१३७१००ओतूर - ९५५२१५७१००आळेफाटा - ९५५२१८६१००देहूरोड (एसडीपीओ) - ९५५२२०६१००पौड - ९५५२४६४१००लोणावळा (एसडीपीओ) ९५५२७८०१००लोणावळा शहर - ९५५२०२६१००लोणावळा ग्रामीण - ९५५२०६३१००कामशेत - ९५५२०६९१००वडगाव मावळ - ९५५२०१८१००सायबर पोलिस ठाणे - ९५५२६७०१००एलसीबी - ९५५२६८०१००नियंत्रण कक्ष— ९५५२६९०१००

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे