पुणे : सकाळी ऊन आणि दुपारनंतर मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मंगळवारी (दि. २०) जोरदार पाऊस पडला. अनेक भागात नाले, चेंबर तुंबले होते. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. तुंबलेले चेंबर मोकळे करण्यासाठी महापालिका कर्मचारी, अधिकारी फिल्डवर पहायला मिळाले. शहरात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता असल्याने वेधशाळेने पुण्याला 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे. पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला. अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडत आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ होत आहे. दुपारी साडेचारनंतर आकाशात काळे ढग भरून आले आणि तासाभरातच शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींना सुरुवात झाली.
अशातच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवत कार्यकर्त्यांनी होडी आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजेंद्र बाबा मोरे यांनी मांजरी येथे होडी आंदोलन केलं. महापालिका आणि पीएमआरडीच्या निषेधार्थ पुण्यातील मांजरी येथे त्यांनी होडी आंदोलन केल्याने प्रशासन गडबडून गेलं आहे.
काल मुसळधार पावसाने पुण्याची दणादण उडवली. काल झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या आहेत असं चित्र निर्माण झालं होतं. यामुळेच पुणे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी होणारी कामं केली आहेत का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आता प्रशासनाचा विरोध म्हणून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात थेट होडी चालवत आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजेंद्र बाबा मोरे यांनी मांजरी भागात महापालिका आणि पीएमआरडीच्या निषेधार्थ पाण्यात होडी चालवून आंदोलन केलं. या अनोख्या आंदोलनाची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे.