पुणेकरांनो पावसाची आता विश्रांती! वरूणराजा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुट्टीवर जाणार
By श्रीकिशन काळे | Updated: July 30, 2023 17:27 IST2023-07-30T17:26:49+5:302023-07-30T17:27:17+5:30
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पाऊस चांगलाच बरसला

पुणेकरांनो पावसाची आता विश्रांती! वरूणराजा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुट्टीवर जाणार
पुणे : यंदा मॉन्सूनने उशीरा हजेरी लावली असली तरी देखील पावसाची सरासरी मात्र चांगली गाठली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही तो बरसला आहे. त्यामुळे पुणेकरांचीपाणीकपात रद्द झाली. गेल्या काही दिवसांपासून वरूणराजा संततधारेने येत होता. पण आता ऑगस्ट महिन्यात मात्र तो सुटीवर जाणार आहे, तसा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. जून व जुलै महिन्यात सुरवातीला जशी गैरहजेरी लावली अगदी तशीच गैरहजेरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे.
मोसमी वाऱ्यांचा पश्चिम -पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. दक्षिण छत्तीसगडावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. वातावरणाच्या वरच्या थरात दोन विरूध्द दिशेने जाणाऱ्या वाऱ्याच्या मधील क्षेत्र दक्षिणेकडे सरकले आहे. ही स्थिती राज्यात मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल आहे. त्यामुळे दोन दिवसांमध्ये घाटमाथ्यावर चांगला पाऊस होणार आहे. परंतु, पुणे शहरात मात्र हलक्या सरी कोसळतील. त्यानंतर १ ऑगस्टनंतर मात्र वरूणराजाची गैरहजेरी असणार आहे.
सध्या एल-निनो सक्रिय झालेला असला तरी त्याचा पावसावर काहीही परिणाम होणार नाही, असे हवामान खात्याने सांगितले आहे. येत्या दोन तीन दिवसांमध्ये पुणे शहर व परिसरात दिवसा आकाश ढगाळ राहणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शहरातील पाऊस
शिवाजीनगर ०.६ मिमी
पाषाण ०.३ मिमी
लोहगाव : ०.४ मिमी