प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! पुणे-प्रयागराज एकमार्गी विशेष रेल्वेगाड्या धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:10 IST2025-12-25T13:08:36+5:302025-12-25T13:10:21+5:30
पुणे ते प्रयागराज दरम्यान दोन एकमार्गी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! पुणे-प्रयागराज एकमार्गी विशेष रेल्वेगाड्या धावणार
पुणे : हिवाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष शुल्कावर पुणे ते प्रयागराज दरम्यान दोन एकमार्गी विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१४११ शनिवारी, दि. २७ डिसेंबर रोजी, तर गाडी क्रमांक ०१४९९ बुधवारी, दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी पुणे येथून सुटेल. २७ डिसेंबरची गाडी दि. २९ डिसेंबरला, तर ३१ डिसेंबरची गाडी दि. २ जानेवारीला पहाटे २ वाजून १० मिनिटांनी प्रयागराज येथे पोहोचेल.
या गाडीला हडपसर, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी व फतेहपूर येथे थांबा देण्यात आला आहे.
ही गाडी २० आयसीएफ डब्यांची असून, त्यामध्ये १४ स्लीपर श्रेणी (आरक्षित), ४ स्लीपर श्रेणी (अनारक्षित) व दोन गार्ड/लगेज व्हॅनचा समावेश आहे. येत्या २५ डिसेंबरपासून या गाडीचे आरक्षण सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.