पुणे : शहरातील वाढत्या वायू व ध्वनिप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने बांधकाम प्रकल्पांच्या वेळांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील बांधकाम प्रकल्पाची कामे सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेतच करता येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकामांमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषणात लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः पहाटे लवकर आणि उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या कामांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक खालावत असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींचा विचार करून बांधकामांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच, नव्याने बांधकाम परवानगी देताना या अटींचा समावेश करण्यात येणार आहे. शहरातील बांधकाम प्रकल्पाची कामे सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेतच करता येणार आहे. महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर हे परिपत्रक लागू करण्यात आले आहे. शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
Web Summary : Pune restricts construction work to 7 AM-9 PM due to rising pollution. The municipality will strictly enforce the rule, penalizing violators and including the condition in new construction permits. This decision aims to control city pollution, according to Pune Municipal Corporation officials.
Web Summary : बढ़ते प्रदूषण के कारण पुणे में निर्माण कार्य सुबह 7 बजे से रात 9 बजे तक सीमित। उल्लंघन करने वालों पर होगी कार्रवाई, नए निर्माण परमिट में शर्त शामिल। पुणे नगर निगम के अनुसार, शहर में प्रदूषण नियंत्रण के लिए निर्णय महत्वपूर्ण है।