पुणे : पोलीस निरीक्षक साजन सानप यांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 14:18 IST2018-11-27T13:46:15+5:302018-11-27T14:18:13+5:30

पुण्यात पोलीस निरीक्षक साजन शंकर सानप (वय 37 वर्ष) यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सानप हे मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

Pune : Police inspector Sajan Sanap jumped under the train and committed suicide | पुणे : पोलीस निरीक्षक साजन सानप यांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीस निरीक्षक साजन सानप यांची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक साजन सानप यांची आत्महत्यासानप यांच्याविरोधात बलात्काराची तक्रारसानप यांच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट

पुणे - पुण्यात पोलीस निरीक्षक साजन शंकर सानप (वय 37 वर्ष) यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सानप हे मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सानप यांच्या आत्महत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मंगळवारी (27नोव्हेंबर)  सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून अपघात असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून शिवाजीनगरकडे जात असताना सानप हे अचानक रेल्वेसमोर जाऊन उभे राहिले. गाडीची त्यांना जोरदार धडक बसली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी सानप यांच्याविरोधात एका महिलेनं बलात्काराची तक्रार नोंदवली होती.  पण सानप यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्टच आहे.

 

Web Title: Pune : Police inspector Sajan Sanap jumped under the train and committed suicide