Video: मी लई बारीक बघतो; हे छा- छु काम आहे; अजितदादांनी थेट 'त्यांच्या भाषेत'च सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 18:06 IST2021-06-11T09:26:27+5:302021-06-11T18:06:52+5:30

Ajit Pawar news: कामाचा दर्जवरून नाराज पवारांनी सुनावले पोलिस आणि कंत्राटदाराला खडे बोल

Pune police experienced Ajit Pawar's anger | Video: मी लई बारीक बघतो; हे छा- छु काम आहे; अजितदादांनी थेट 'त्यांच्या भाषेत'च सुनावलं

Video: मी लई बारीक बघतो; हे छा- छु काम आहे; अजितदादांनी थेट 'त्यांच्या भाषेत'च सुनावलं

सकाळी सकाळी पोलिस मुख्यालयात दाखल झालेल्या अजित पवारांची ' दादा' गिरी आज पुणेपोलिसांना अनुभवायला मिळाली.मुख्यालयात केलेल्या कामाचा दर्जा वरून त्यांनी थेट कंत्राटदाराला खडे बोल सुनावले. इतकंच नाही तर पोलिसांचे काम असे होत असेल तर बाकीच्यांचे काय असा सवाल देखील पवार यांनी उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे पोलिसांचा शिवाजीनगर येथील मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी इथे सुरू आलेल्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी देखील केली. पण हे काम योग्य त्या दर्जाचं झालं नसल्याचं यावेळी पवारांचा लक्षात आलं. आणि त्यांनी थेट कंत्राटदाराला बोलावून घेत पोलिस आणि कंत्राटदाराला कामाचा दर्जा वरून खडे बोल सुनावले.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना अजित पवार म्हणाले ,"गुप्ता मला अश्या कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो.माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा- छु काम आहे.या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलय तर बाकीच्यांचे काय?"

 

Web Title: Pune police experienced Ajit Pawar's anger