शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Pune Police Drug Action: ड्रग्जचे सेवन कुठे, कसे, कधीपासून; 'त्या' २१ जणांची पुणे पोलीस आयुक्तांकडून शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 09:32 IST

Pune Police Drug Action ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांचे वय, ते विद्यार्थी आहेत की नोकरी करणारे, सेवन कुठे आणि कसे केले, किती कालावधीपासून ही सवय आहे, अशा विविध बाबींची माहिती नोंदविली जाणार

पुणे : अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या आरोपींच्या चौकशीतून एक मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणाच्या धागेदोऱ्यांवर काम करताना पोलिसांना ड्रग्जचे सेवन करणाऱ्या अनेक व्यक्तींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी (दि. ६) २१ जणांची पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बोलवून घेत शाळा घेतली. या प्रक्रियेतून ड्रग्ज सेवन करणाऱ्यांचा नेमका पॅटर्न, त्यांची सवय, तसेच त्यामागील साखळी समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राज्यात ड्रग्जविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्य ड्रग्जमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनीही ही मोहीम सक्रियपणे राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत अशा प्रकारच्या प्रकरणांचा सखोल तपास करून ड्रग्जचे जाळे उद्ध्वस्त करण्यावर भर दिला जात आहे.

दरम्यान, अपहरण प्रकरणाचा तपास करीत असताना उत्तमनगर पोलिसांनी ड्रग्जशी संबंधित हे प्रकरण उघड केले. या कारवाईत सुनील गोपाळ राठोड ऊर्फ राठ्या राठोड (वय २८), राजन गोपाल नायर (३७), जतीन जयवंत कदम (२६, रा. वारजे) आणि शुभम संतोष दहिभाते (२८, रा. कोंढवे धावडे) या चौघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या ताब्यातून मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता, जो शहरात मोठ्या प्रमाणावर पुरविला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुढील तपासांत आरोपी सुनील ऊर्फ राठ्या राठोड यांच्या मोबाईल फोनची तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये सुमारे ३०० ते ३५० बँक व्यवहारांची नोंद आढळून आली. या व्यवहारांमधून ड्रग्ज खरेदी-विक्रीशी संबंधित आर्थिक साखळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी ७६ जणांची नावे निश्चित करून त्यांचा शोध सुरू केला. यापैकी अनेकजण प्रत्यक्ष ड्रग्ज सेवन करणारे असल्याचे उघड झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी २१ जणांना सोमवारी ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. या व्यक्तींकडून त्यांची रोजची नोंद म्हणजेच रोजनिशी भरून घेतली जाणार आहे. त्यामध्ये त्यांचे वय, ते विद्यार्थी आहेत की नोकरी करणारे, ड्रग्जचे सेवन कुठे आणि कसे केले, किती कालावधीपासून ही सवय आहे, अशा विविध बाबींची माहिती नोंदविली जाणार आहे. या सर्व माहितीच्या आधारे ड्रग्ज सेवन करणाऱ्यांचा पॅटर्न अभ्यासून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. सध्या पोलिसांकडून या सर्व व्यक्तींची कसून चौकशी सुरू असून, ते आणखी कोणाकडून ड्रग्ज घेत होते का, किंवा या जाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का ?, याचा शोध घेतला जात आहे. या तपासातून ड्रग्ज पुरवठा साखळीतील आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यात एका माजी सरपंच असलेल्या तरुणाचाही समावेश होता. तो मित्रांसोबत पार्टीला गेला होता. काही मित्रांमुळे मी ड्रग्ज घेतले आणि त्यांच्या मोबाईलमधून पेमेंट केले, असे त्याने सांगितले. मात्र, तपासणीवेळी संबंधित माजी उपसरपंचाने आपण असे काही करत नसल्याचेही स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Police Crackdown: Drug Users Grilled, Network Under Investigation

Web Summary : Pune police, investigating a kidnapping, uncovered a drug racket. Twenty-one users were questioned to understand their habits and the supply chain. This action follows the state's anti-drug campaign, aiming to dismantle drug networks and identify key players.
टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थStudentविद्यार्थीEducationशिक्षणEmployeeकर्मचारीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीHealthआरोग्य