Plastic ban : लग्नसोहळ्यात प्लास्टिक फुलांना बंदी; पुण्यात विक्रेत्यांची कोंडी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 11:20 IST2026-03-01T11:18:43+5:302026-03-01T11:20:02+5:30

पुण्यातील डेकोरेशन व्यवसायावर मात्र मोठे संकट ओढवले आहे. पुण्यात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे

pune Plastic ban news Plastic flowers banned at weddings; Pune vendors likely to face dilemma | Plastic ban : लग्नसोहळ्यात प्लास्टिक फुलांना बंदी; पुण्यात विक्रेत्यांची कोंडी होण्याची शक्यता

Plastic ban : लग्नसोहळ्यात प्लास्टिक फुलांना बंदी; पुण्यात विक्रेत्यांची कोंडी होण्याची शक्यता

पुणे :पुणे हे लग्नसराई आणि सजावटीच्या साहित्यासाठी एक मोठे केंद्र आहे. मात्र नुकतेच लग्नात प्लास्टिक फुले वापरल्यास कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभा अधिवेशनात दिले आहे. यावर लवकरच शासन निर्णय काढणार असल्याचे स्पष्ट करताच पुणे शहरातील व उपनगरातील विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. प्लास्टिकबंदीच्या मोहिमेला आता अधिक कडक स्वरूप प्राप्त होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणाला नक्कीच फायदा होईल. मात्र या निर्णयामुळे शहरातील गुलटेकडी मार्केटयार्ड फूल बाजार, मंडई, बोअर आळी, रविवार पेठ, पिंपरी औद्योगिक वसाहत आदी फुलांच्या मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

एकीकडे पर्यावरणाचे रक्षण होत असताना, दुसरीकडे पुण्यातील डेकोरेशन व्यवसायावर मात्र मोठे संकट ओढवले आहे. पुण्यात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. यातून करोडो रुपयांची उलाढाल होते. पण या निर्णयामुळे डेकोरेटर्सची गणिते पूर्णपणे बिघडली आहेत. ही बंदी पर्यावरणासाठी चांगली असली तरी, प्रशासनाने व्यापाऱ्यांना हा माल संपवण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा होता, अशी मागणी पुणे डेकोरेटर्स असोसिएशनकडून केली जात आहे.

- मुख्यमंत्र्यांचा निर्णय आणि कारवाईचा इशारा :

विधानसभा अधिवेशनात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, लग्नसमारंभात प्लास्टिकच्या फुलांचा वापर करणे हा कायद्याने गुन्हा ठरेल. केवळ वापरकर्त्यांवरच नाही, तर ही फुले विकणाऱ्या आणि साठवणूक करणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

- या निर्णयामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी -

- अनेकांचे धाबे दणाणले असून स्वस्त आणि टिकणारी म्हणून प्लास्टिकच्या फुलांची मोठी मागणी असते. अचानक आलेल्या या निर्णयामुळे कोट्यवधींचा माल गोदामात पडून राहण्याची भीती विक्रेत्यांना वाटत आहे. तसेच काही व्यापाऱ्यांनी लग्नसराईसाठी आगाऊ ऑर्डर देऊन साठा करून ठेवला होता. आता हा साठा विकायचा कसा, असा प्रश्न व्यापाऱ्यांच्या पडत आहे.

- डेकोरेशन व्यावसायिकांची कोंडी -

शहरात लग्नसराईमुळे डेकोरेटर्सनी लाखो रुपये खर्च करून प्लास्टिकच्या फुलांचे ‘सेट्स’ आणि ‘बॅकड्रॉप्स’ तयार करून ठेवले आहेत. अचानक आलेल्या बंदीमुळे ही सर्व गुंतवणूक आता ‘भंगार’ ठरणार असून मोठे नुकसान होणार आहे.

- नैसर्गिक फुले महाग असतात आणि ती लवकर सुकतात. प्लास्टिकची फुले एकदा घेतली की अनेक लग्नांना वापरता येत होती. आता नैसर्गिक फुलांचा वापर केल्यास लग्नाचा एकूण खर्च ३०% ते ४०% टक्क्यांनी वाढू शकतो. हा सामान्यांना परवडणार नाही.

- ॲडव्हाॅन्स बुकिंगचे संकट:

लग्नसराईच्या तारीख आधीच बुक केली आहे. तर कमी दरात ऑर्डर्स घेतल्या आहेत, त्यांना आता नवीन नियमानुसार नैसर्गिक फुले वापरणे परवडणारे नाही. ग्राहकांकडून जास्तीचे पैसे मागितले तर सध्या परवडणारे नाही. याचा फटका सहन करावा लागणार आहे.  प्लास्टिक फुलांच्या होलसेल विक्रीला मोठा फटका बसत आहे.

प्रदूषण नियंत्रण: प्लास्टिकची फुले कधीही विघटित होत नाहीत, ज्यामुळे कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होत आहे. हा सरकारचा निर्णय योग्यच आहे. त्यामुळे फूल उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाईल आणि बाजारात मोठ्या प्रमाणात फुलांची आवक झाल्यास शेतकऱ्यांना याचा चांगले फायदेशीर ठरणार आहे.  -  अरुण वीर अध्यक्ष, अखिल पुणे फूल बाजार आडते असोशिएशन 

नैसर्गिक शेतीला चालना मिळणार आहे. प्लास्टिकचा वापर थांबल्यास खऱ्या फुलांची मागणी वाढेल, ज्याचा थेट फायदा फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होईल आणि यातून फूल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. - सागर भोसले, फूल व्यापारी समन्वयक पुणे.

लग्न डेकोरेशनची ॲडव्हाॅन्स बुकिंग केलेले असते. यातून व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होणार आहे. प्लास्टिकची फुले स्वस्त असतात आणि ती खराब होत नाहीत, त्यामुळे त्यात जास्त नफा मिळतो. बंदीमुळे सामान्य व्यावसायिकांबरोबर सामान्य ग्राहकांना तोटा सहन करावा लागणार आहे.  - सलीम शेख विक्रेते सहकारनगर

शोभिवंत फुलांनी मागणी :

असे आहेत दर

नैसर्गिक फुलांचे प्रकार दर

झेंडू : ४० ते ५० रुपये किलो

गुलछडी : १३० रुपये किलो

शेवंती : ८० ते १३०

गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : २० ते ४०

-कार्नेशियन : १२० ते १५० -

-ऑर्चिड ५०० ते ६००

-ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०- ते १००

- डेकोरेटेड कृत्रिम फुलांचे प्रकार दर

कृत्रिम कापडी व कागदी ही फुले पॉलिस्टर, नायलॉन किंवा मखमली कापडापासून बनलेली असतात. ती दिसायला नैसर्गिक वाटतात आणि धुऊन पुन्हा वापरता येतात. याचे दर एक मालपासून १० माल असतात .याचे दर ४० रुपयांपासून से १०० रुपये तयार माल मिळते.

सिलिकॉन रबर फुले ही प्रिमियम दर्जाची फुले असतात. यांना स्पर्श केल्यास ती खऱ्या फुलांसारखी मऊ वाटतात. प्लास्टिकबंदीच्या कक्षेत ही फुले येतात की नाही, यावर अद्याप संभ्रम असून हे दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. दर ५० रुपये ते १२० पर्यंत माल असते.

सुकी फुले नैसर्गिक फुलांना सुकवून त्यावर प्रक्रिया केली जाते. ही सध्या ‘बोहो’ थीमसाठी अत्यंत लोकप्रिय आहेत. यातून गाडी सजवणे आणि डेकोरेशसाठी जादा वापर केला जातो. इतर नैसर्गिक फुलांपेक्षा याचा वापर जास्त केला जातो. याचा खर्च ही कमी असतो. यामुळे व्यावसायिक याचा तुलनेने वापर जास्त करतात.

Web Title : शादियों में प्लास्टिक के फूलों पर प्रतिबंध: पुणे के विक्रेताओं पर संकट

Web Summary : पुणे में शादियों की सजावट उद्योग प्लास्टिक के फूलों पर प्रतिबंध से बाधित है। विक्रेताओं को मौजूदा स्टॉक पर नुकसान का डर है। प्राकृतिक फूलों की लागत बढ़ने से बजट प्रभावित हो सकता है। फूल किसानों को लाभ हो सकता है।

Web Title : Plastic Flower Ban at Weddings: Pune Vendors Face Uncertainty

Web Summary : Pune's wedding decor industry faces disruption as a plastic flower ban looms. Vendors fear losses on existing stock. Natural flower costs could surge, impacting budgets. Flower farmers may benefit.