ओतूरमध्ये ट्रक-स्कुटी धडकेत महिलेचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 14:39 IST2026-04-03T14:38:59+5:302026-04-03T14:39:46+5:30

- अपघातानंतर त्या रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती.

pune Ootur accident news Road potholes claimed lives Accident at Monica Chowk, Otur; 28-year-old girl dies | ओतूरमध्ये ट्रक-स्कुटी धडकेत महिलेचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल

ओतूरमध्ये ट्रक-स्कुटी धडकेत महिलेचा मृत्यू, CCTV फुटेज व्हायरल

जुन्नर (पुणे जि.) – ओतूर येथील मोनिका चौकात शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका २८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ११.२० वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि स्कुटी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात स्कुटीच्या मागील सीटवर बसलेल्या स्नेहल रविंद्र अहिनवे (वय २८) या गंभीर जखमी झाल्या.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसते की धडकेनंतर स्नेहल या रस्त्यावर पडल्या आणि दुर्दैवाने ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांना तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ओतूर परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title : सड़क के गड्ढों ने ली जान? ओतुर में दुर्घटना, 28 वर्षीय युवती की मौत

Web Summary : जुन्नर के ओतुर में एक दुखद दुर्घटना में 28 वर्षीय स्नेहल अहिनवे की मौत हो गई। ट्रक और स्कूटर की टक्कर में उन्हें घातक सिर में चोटें आईं। स्थानीय लोगों ने उसे अस्पताल पहुंचाया, लेकिन उसे मृत घोषित कर दिया गया। इस घटना से इलाके में शोक की लहर है।

Web Title : Potholes Claim Life? 28-Year-Old Dies in Ootur Accident

Web Summary : A 28-year-old woman, Snehal Ahinve, died in a tragic accident in Ootur, Junnar. The collision between a truck and scooter resulted in fatal head injuries. Locals rushed her to the hospital, but she was declared dead. The incident has cast a pall of gloom over the region.