शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुण्यात निसर्गाचा चमत्कार....! दुर्मीळ पांढराशुभ्र गावकावळा ठरतोय आकर्षणाचे केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 18:03 IST

- कावळा पांढरा दिसण्यामागील कारण म्हणजे 'ल्युसिजम' ही एक दुर्मीळ जैविक स्थिती होय.

कात्रज : कावळा तर प्रत्येकालाच माहीत आहे आणि बहुधा सर्वांनी तो पाहिलेलाही असतो; परंतु एक अत्यंत दुर्मीळ, संपूर्ण पांढऱ्या रंगाचा गावकावळा आढळून आलेला आहे. हा कावळा नेहमीप्रमाणे काळ्या रंगाच्या कावळ्यांच्या थव्यातच वावरताना दिसला. मात्र नेहमी पाहणाऱ्या त्याचा रंग हा आपण कावळ्याच्या रंगाप्रमाणे नसून, त्याच्या पूर्ण शुभ्र पांढऱ्या रंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.पुणे शहरातील पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी हा कावळा पाहिला. त्यांनी तत्काळ याबाबत पक्षिप्रेमी बाळासाहेब ढमाले व निसर्ग अभ्यासक आकाश राऊत यांना ही माहिती दिली. त्यानंतर या दुर्मीळ कावळ्याचे निरीक्षण करण्यात आले. त्यानुसार त्यांनी अशी माहिती दिली की, कावळा पांढरा दिसण्यामागील कारण म्हणजे 'ल्युसिजम' ही एक दुर्मीळ जैविक स्थिती होय. सामान्यतः पक्ष्यांच्या शरीरात मेलेनिन नावाचे रंगद्रव्य तयार होत असते, ज्यामुळे त्यांच्या पिसांना काळा, तपकिरी किंवा इतर रंग प्राप्त होतो; परंतु जनुकांमधील बदल किंवा बिघाडामुळे जेव्हा हे रंगद्रव्य योग्य प्रमाणात तयार होत नाही, तेव्हा पक्ष्यांची पिसे पूर्णतः किंवा अंशतः पांढरी दिसू लागतात. या स्थितीला 'ल्युसिजम' असे म्हणतात.महत्त्वाचे म्हणजे 'ल्युसिजम' आणि 'अल्बिनिझम' या दोन वेगळ्या स्थिती आहेत. अल्बिनिझममध्ये पक्ष्यांच्या डोळ्यांचा रंग लालसर दिसतो, तर ल्युसिजममध्ये डोळ्यांचा नैसर्गिक रंग कायम राहतो.  पुण्यात आढळलेला हा कावळा ल्युसिजमचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे पक्षिप्रेमी बाळासाहेब ढमाले व निसर्ग अभ्यासक आकाश राऊत यांनी सांगितले.आकर्षणाचा बिंदूशहरांमध्ये वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अशा निरीक्षणांमुळे निसर्ग संवर्धनाची गरज अधिक अधोरेखित होते. नागरिकांनी अशा दुर्मीळ पक्ष्यांचे संरक्षण करण्यासाठी जागरूक राहणे आणि त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास न देणे अत्यंत गरजेचे आहे. पुण्यात आढळलेला हा 'शुभ्र गाव कावळा' निसर्गातील विविधतेचे जिवंत उदाहरण असून, निसर्गप्रेमी-अभ्यासकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Rare White Crow in Pune: Nature's Spectacle Attracts Attention

Web Summary : A rare, all-white crow, caused by leucism, has been spotted in Pune, attracting nature enthusiasts. Unlike albinism, leucism retains the natural eye color. Experts emphasize conserving such unique biodiversity in urban environments and avoiding disturbance to these rare birds.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAnimalप्राणी