वीजपंप सुरू करताना वीजेचा धक्का; मंचरमध्ये तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:23 IST2026-02-01T18:21:55+5:302026-02-01T18:23:30+5:30

या धक्क्याने तो घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्यात फेकला गेला.

pune news Young farmer dies after getting electrocuted while starting electric pump in Manchar | वीजपंप सुरू करताना वीजेचा धक्का; मंचरमध्ये तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

वीजपंप सुरू करताना वीजेचा धक्का; मंचरमध्ये तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

मंचर : वीजपंप सुरू करण्यासाठी घोडनदीवर गेलेल्या तरुणाचा वीज वाहक खांबाच्या तारेला लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रकांत मारुती पिंगळे (वय ३४) असे त्या तरुणाचे नाव असून ही घटना श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील घोडनदीच्या काठावर सकाळी ११ वाजता घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

श्री कुलस्वामी पतसंस्थेत काम करणारा चंद्रकांत पिंगळे हा तरुण घरची शेती स्वतः करत होता. घोडनदीवरून वीज पंपाद्वारे पाणीपुरवठा पिंगळेमळा येथील शेतीसाठी करण्यात येत होता. रविवारी सुट्टी असल्याने सकाळी साडेदहा वाजता तो वीजपंप सुरू करण्यासाठी घोडनदी काठावर गेला होता. त्यावेळी तेथे विलास बोराडे व इतर शेतकरी हजर होते. वीज पंप सुरू करताना तो नदीच्या कडेला गेला असता वीज वाहक खांबाच्या तारेला विद्युत प्रवाह आल्याने त्याला विजेचा धक्का बसला. या धक्क्याने तो घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्यात फेकला गेला.

आवाज ऐकून बाजूचे शेतकरी धावत आले. त्यांना चंद्रकांत पिंगळे पाण्यात पडलेला दिसला. फोनवरून मदतीसाठी संपर्क केला गेला. पोलिस पाटील निखिल तारू, श्रीराम डोके, वैभव चव्हाण, शरद लोखंडे, किशोर टेके, संजय काळे, महेश डोके, बाळासाहेब शिंदे आदीनी तातडीने चंद्रकांत पिंगळे याला पाण्याच्या बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, आठ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या संदर्भात संतोष बबन पिंगळे यांनी मंचर पोलिसात माहिती दिली. तपास मंचर पोलिस करत आहेत.

Web Title : पानी का पंप शुरू करते समय बिजली के झटके से युवा किसान की मौत

Web Summary : मंचर में, 34 वर्षीय किसान चंद्रकांत पिंगले की घोड़नदी के पास पानी का पंप शुरू करते समय करंट लगने से मौत हो गई। वह एक लाइव तार के संपर्क में आ गया और नदी में गिर गया। स्थानीय किसान मदद के लिए दौड़े, लेकिन अस्पताल पहुंचने पर उसे मृत घोषित कर दिया गया। घटना से इलाके में शोक है।

Web Title : Young Farmer Dies of Electric Shock While Starting Water Pump

Web Summary : In Manchar, a 34-year-old farmer, Chandrakant Pingle, died of electrocution while starting a water pump near Ghodnadi. He came into contact with a live wire, falling into the river. Local farmers rushed to help, but he was declared dead upon arrival at the hospital. The incident has caused grief in the area.