कोंढापुरी पेट्रोलपंपावरील कामगाराने ४ लाखांची केली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 19:25 IST2025-10-28T19:24:03+5:302025-10-28T19:25:59+5:30
चांदेकर यांनी पेट्रोलपंपावर येऊन चौकशी केली तसेच राजनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

कोंढापुरी पेट्रोलपंपावरील कामगाराने ४ लाखांची केली चोरी
रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरुर) येथील वाघेश्वर हब नावाच्या पेट्रोलपंपावर कामगार म्हणून कार्यरत असलेल्या राजन खिलारे यांच्याकडे पेट्रोलपंप मालक सोपान चांदेकर येईपर्यंत पेट्रोलपंपवरील रक्कम ठेवलेली असते.
सकाळच्या सुमारास सोपान चांदेकर हे राजनला वारंवार फोन करत असताना संपर्क साधू शकले नाहीत. तसेच, अन्य कामगारांनीही सांगितले की राजन खिलारे पेट्रोलपंपावर नाही. त्यामुळे सोपान चांदेकर यांनी पेट्रोलपंपावर येऊन चौकशी केली तसेच राजनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.
पेट्रोलपंपावरील हिशोब तपासल्यावर समजले की, राजनने पेट्रोलपंपावरील चार लाख रुपये घेऊन फरार झाला आहे. या प्रकरणी सोपान महादू चांदेकर (वय ४२ वर्षे), रा. दत्त मंदिर जवळ, वाकड (ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी राजन निवृत्ती खिलारे, सध्या रा. कोंढापुरी (ता. शिरूर), जि. पुणे आणि मूळ रा. महालेनगर वडारवाडी, पुणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस हवालदार अतुल पखाले करत आहे.