माळेगांवकर कट्टर राजकीय विरोधकांची युती स्वीकारणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:19 IST2025-12-03T13:18:01+5:302025-12-03T13:19:17+5:30
- नगरपंचायत निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला नामुष्की सहन करावी लागली

माळेगांवकर कट्टर राजकीय विरोधकांची युती स्वीकारणार का ?
माळेगाव : माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रथमच कट्टर राजकीय विरोधक असणारे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजप नेते प्रथमच एकत्र आले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते रंजनकुमार तावरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटासह काही अपक्ष एकत्रित आले होते. मात्र, माळेगांवकर कट्टर राजकीय विरोधकांची युती स्वीकारणार का, यासाठी २१ डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.
नगरपंचायत निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला नामुष्की सहन करावी लागली. त्यांना ‘तुतारी’ या चिन्हावर फक्त सहा प्रभागांमध्ये उमेदवार मिळाले; तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हासुद्धा पुरस्कृत करण्याची वेळ आली. चार प्रभागांमध्ये उमेदवारांना पुरस्कृत केले.
अजित पवार गटाने नगराध्यक्ष पदासह दहा जागांवर उमेदवार उभे केले; तर कट्टर राजकीय विरोधक माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांच्याशी आघाडी करत त्यांच्या नेतृत्वाखालील जनमत आघाडीला अधिकृत पाच उमेदवार दिले, तर दोन पुरस्कृत केले. शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ या चिन्हावर दहाच उमेदवार उभे राहिल्याने या पक्षाची माळेगावमध्ये मोठी तिची पिछेहाट झाल्याचे मानले जाते.