शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बळीराजाच्या हाकेला महावितरण धावून येईल का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 14:44 IST

भारनियमन वेळ बदलण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी

निरा नरसिंहपूर : इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपरी बुद्रूक ते नरसिंहपूर परिसरात संध्याकाळी ६ ते १० या वेळेत होणाऱ्या भारनियमनामुळे ग्रामीण भागातील उद्योग-धंदे तसेच सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना मोठा त्रास होऊ लागला आहे. नरसिंहपूर, पिंपरी बुद्रूक, टणू, गिरवी, गणेशवाडी, शिंदेवस्ती, चव्हाण वस्ती, सुतार वस्ती, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, लिंबुडी आणि आसपासच्या सर्व भागांतील शेतकरी चिंतेत आहेत.गावठाण क्षेत्रातील नागरिकांना विजेचा पुरवठा नसल्यामुळे त्यांच्या मुलांना अंधारात अभ्यास करता येत नाही. संध्याकाळच्या वेळी शेतातील जनावरांच्या गोठ्यातही शेतकरी काम करू शकत नाहीत. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या लोडशेडिंगच्या त्रासाने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन नीरा आणि भीमा नदीकाठच्या गावांत चोरीचे प्रमाण वाढले आहे. संध्याकाळी सहा ते रात्री दहा या चार तासांच्या भारनियमनाला महावितरण विभागाने रद्द करावे, अशी मागणी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. संध्याकाळचे भारनियमन रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून, छोटे-मोठे व्यावसायिक आणि उद्योजक यांनी केली आहे.घरातील चोरीच्या घटना आणि नदीकाठच्या विद्युत पंप तसेच विहीर व बोर येथील विद्युत पंपांसह केबल्स चोरण्याच्या घटना वाढल्या आहेत. सध्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू असल्यामुळे गरीब आणि गरजू शेतकऱ्यांच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. उद्योजक आणि ग्रामस्थ त्यांच्याकडून भारनियमनाच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी करत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? हा प्रश्न सध्या उपस्थित आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Will MSEDCL Respond to Farmers' Plea Regarding Power Outages?

Web Summary : Farmers in Indapur are suffering due to evening power outages, impacting homes, businesses, and studies. Increased theft and hardship for students are reported. Locals demand MSEDCL cancel the evening load shedding for relief.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रelectricityवीज