Video : पुणे-नगर महामार्गावर दोन अपघातात दोघा जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:15 IST2026-03-10T16:14:03+5:302026-03-10T16:15:21+5:30

-स्थानिक नागरिकांनी दोन्ही अपघातातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले

pune news video two people died in two accidents on Pune-Nagar highway | Video : पुणे-नगर महामार्गावर दोन अपघातात दोघा जणांचा मृत्यू 

Video : पुणे-नगर महामार्गावर दोन अपघातात दोघा जणांचा मृत्यू 

रांजणगाव गणपती : पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर व कासारी फाट्याजवळ दोन वेगवेगळ्या दुचाकींना अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने झालेल्या अपघातात महेश धोंडीराम भगत आणि सचिन वसंत आडे हे दोघे मृत्युमुखी पडले आहेत.

दि.९ रोजी पहाटेच्या सुमारास महेश भगत हे त्यांच्याकडील दुचाकीवरून अहिल्यानगर बाजूने पुण्याच्या दिशेने येत असताना, कासारी फाटा जवळील एका हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला, ज्यात महेश भगत जखमी झाले. तसेच, याच मार्गावरून सचिन आडे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना कोंढापुरी येथे पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन आडे गंभीर जखमी झाले.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी दोन्ही अपघातातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी महेश धोंडीराम भगत (वय ४४) सध्या रा. शिक्रापूर ता. शिरूर, मूळ रा. काले ता. जुन्नर) आणि सचिन वसंत आडे (वय ३०) रा. रांजणगाव गणपती, मूळ रा. ईश्वरनगर तांडा ता. उमरी जि. नांदेड यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी पवन रामचंद्र चव्हाण (वय २०) रा. रांजणगाव गणपती, मूळ रा. पळसगाव तांडा ता. उमरी जि. नांदेड आणि प्रवीण शंकर धुमाळ (वय ३९) रा. पिंपळे धुमाळ ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार किशोर तेलंग आणि अतुल पखाले करत आहेत.

Web Title : पुणे-नगर राजमार्ग दुर्घटना: दो अलग घटनाओं में दो की मौत

Web Summary : पुणे-नगर राजमार्ग पर शिक्रापुर और कसारी फाटा के पास दो अलग-अलग दुर्घटनाओं में महेश भगत और सचिन आड़े की मौत हो गई। अज्ञात वाहनों ने उनकी मोटरसाइकिलों को टक्कर मार दी। पुलिस ने अज्ञात चालकों के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।

Web Title : Pune-Nagar Highway Accidents: Two Killed in Separate Incidents

Web Summary : Two separate accidents on the Pune-Nagar highway near Shikrapur and Kasari Phata resulted in the deaths of Mahesh Bhagat and Sachin Aade. Unknown vehicles struck their motorcycles. Police have registered a case against the unidentified drivers and are investigating.