Video : वाहतूक पोलिसांची डोळेझाक? मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवाशांच्या जीवाशी खेळ;धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:16 IST2025-12-05T13:12:56+5:302025-12-05T13:16:55+5:30
हा व्हिडिओ चर्चेत आला असून याकडे वाहतूक पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

Video : वाहतूक पोलिसांची डोळेझाक? मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवाशांच्या जीवाशी खेळ;धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
पुणे - जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत परिसरात रिक्षा चालक बेफिकीरपणे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओत व्हिडिओत क्षमतेपेक्षा चारपट प्रवासी रिक्षात प्रवास करतांना दिसत आहे. तर काही प्रवासी अक्षरशः लटकून प्रवास करत आहे. हा व्हिडिओ चर्चेत आला असून याकडे वाहतूक पोलिसांचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
कामशेत परिसरात सकाळी कामावर जाण्या–येण्यासाठी आणि संध्याकाळी घरी परतण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी रिक्षांचा वापर करतात. मात्र, या गर्दीचा गैरफायदा घेत काही रिक्षाचालक तब्बल १२ ते १५ प्रवासी एकाच रिक्षात कोंबून महामार्गावर भरधाव वेगात धावतात. आरटीओच्या नियमांनुसार रिक्षामध्ये केवळ तीन प्रवाशांना परवानगी असतानाही या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.
वाहतूक पोलिसांची डोळेझाक? मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवाशांच्या जीवाशी खेळ; धक्कादायक Video Viral
— Lokmat (@lokmat) December 5, 2025
पुणे: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत परिसरात रिक्षाचालक बेफिकीरपणे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओत क्षमतेपेक्षा चारपट… pic.twitter.com/NxFTiaol4n
अनेक प्रवासी मागील दरवाजाला लटकून प्रवास करत असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. जुन्या महामार्गावर आधीच अपघातांचे प्रमाण वाढले असताना अशी बेफिकिरी गंभीर धोक्याचे रूप धारण करत आहे. मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी घेणे हा मोटार वाहन कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून अशा वाहनांवर कठोर कारवाई आवश्यक आहे. मात्र, वाहतूक पोलीस या प्रकरणी कारवाई करण्यास उदासीन असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. कामशेत परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रिक्षाचालकांवर तात्काळ कारवाई आणि नियमित तपासणीची मागणी आता अधिक जोर धरत आहे.