इतर जिल्ह्यातील वाहनांनाही आता पुण्यात बसविता येणार हाय सिक्युरिटी नंबरप्लेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 10:04 IST2025-03-12T10:03:25+5:302025-03-12T10:04:36+5:30

एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी फीटमेंट सेंटरची संख्या वाढवले जाणार; ‘आरटीओ’ने रोझमार्टा कंपनीला दिले आदेश

pune news vehicles from other districts can now also be fitted with high security plates in Pune | इतर जिल्ह्यातील वाहनांनाही आता पुण्यात बसविता येणार हाय सिक्युरिटी नंबरप्लेट

इतर जिल्ह्यातील वाहनांनाही आता पुण्यात बसविता येणार हाय सिक्युरिटी नंबरप्लेट

पुणे : शिक्षण, नोकरी आणि उद्याेग व्यवसायानिमित्त पुण्यात वास्तव्यास असलेल्या इतर जिल्ह्यांतील वाहनधारकांनाही आता पुण्यात ‘उच्च सुरक्षा पाटी’ उपलब्ध हाेणार आहे. यादृष्टीने फीटमेंट सेंटर वाढवा, तसेच सोसायटी, कंपनी अथवा एकाच ठिकाणी २५ पेक्षा जास्त नोंदणी असलेल्या वाहनांना होम डिलिव्हरी शुल्क घेऊ नका, अशा सूचना ‘आरटीओ’कडून रोझमार्टा कंपनीला देण्यात आल्या आहेत. काही फीटमेंटचालक वाहनधारकांना कोणतीही पूर्वसूचना न देता, फीटमेंट सेंटर बंद करत आहेत. यामुळे ज्येष्ठांना हेलपाटे मारावे लागत असून, हा प्रकार थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांना ‘उच्च सुरक्षा पाटी’ लावण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. यासाठी परिवहन विभागाने वाहनधारकांना ३० एप्रिल २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्यभरातील नागरिक पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची वाहने इतर शहरांमध्ये नोंदणी केलेली असल्याने त्यांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) लावण्यास अडचणी येत हाेत्या. ही गैरसाेय दूर करण्यासाठी पुण्यात सेंटर वाढविण्यात येणार आहेत. वाहनधारकांनी यानुसार आता एचएसआरपी नोंदणी करताना पुणे सेंटर निवडून हा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या शहरांमध्ये नोंदणी असलेल्या आणि पुण्यात वापरत असलेल्यांना नंबर प्लेट लावण्यासाठी दिलासा मिळणार आहे.

जवळपास २५ लाख वाहनांना लागल्या पाट्या 

देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट देणे बंधनकारक केल्याने नवीन वाहन खरेदी केल्यानंतर या नंबर प्लेट लावले जाते. मात्र, २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे. पुण्यात जवळपास २५ लाख वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्यात येणार आहे. सध्या पुण्यात १२५ फीटमेंट सेंटर सुरू आहेत. पण, ती वाहन संख्येच्या दृष्टीने पुरेशी नाहीत. त्यामुळे एचएसआरपी बसविण्यासाठी खूप वेळ लागत आहे. सध्या दिवसाला पाच ते सहा हजार वाहनांची नोंदणी होत असून, साधारण एक ते दीड हजार वाहनांना एचएसआरपी बसविण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात मोठ्या संख्येने फिटमेंट सेंटर वाढविण्यात यावी. यासंदर्भात पुणे आरटीओने रोझमार्टा कंपनीला पत्र पाठवून विविध सूचना केल्या आहेत.

फीटमेंटचे काम संथ गतीने

पुण्यात २५ लाख वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. आतापर्यंत एक लाख ४२ हजार वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी अर्ज केले आहेत. पण, पुण्यातील गाड्यांची संख्या पाहता हे प्रमाण खूप संथ आहे. सध्या पुण्यात १२५ फीटमेंट सेंटर सुरू आहेत. पण, ती वाहनसंख्येच्या दृष्टीने पुरेशी नाही. त्यामुळे एचएसआरपी बसविण्यासाठी खूप वेळ लागत आहे. सध्या दिवसाला पाच ते सहा हजार वाहनांची नोंदणी होत असून, एक ते दीड हजार वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. हे काम संथ गतीने सुरू आहे.

२५ पेक्षा जास्त वाहन असल्यास होम डिलिव्हरी शुल्क घेऊ नका

पुण्यातील वाहनांची संख्या पाहता फीटमेंट सेंटर वाढवा. सोसायटी, कंपनी अथवा एकाच ठिकाणी २५ पेक्षा जास्त नोंदणी असलेल्या वाहनांना होम डिलिव्हरी शुल्क घेऊ नका. नागरिकांना एचएसआरपी बसविण्यासाठी अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचना कंपनीला देण्यात आल्या आहेत. 

वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे पुण्यात फीटमेंट सेंटर वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाहेरच्या शहरात नोंदणी असलेल्या वाहनांनाही आता पुण्यात एचएसआरपी बसविता येणार आहे. त्यांची केंद्र येथे आहेत. यासाठी वाहनधारकांनी नोंदणी करताना पुण्याचे सेंटर निवडावे. - स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

 

Web Title: pune news vehicles from other districts can now also be fitted with high security plates in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.