टँकरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; वारजे परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:38 IST2025-04-06T16:36:34+5:302025-04-06T16:38:26+5:30
- पाण्याचा टँकर मागे येत असताना त्याखाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

टँकरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; वारजे परिसरातील घटना
वारजे : येथील गणपती माथा भागात वारजे पोस्ट ऑफिसच्या शेजारील लेनमध्ये पाण्याचा टँकर मागे येत असताना त्याखाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अदोक्षक महेश वहाळे (वय १८ महिने), असे मृत बाळाचे नाव आहे. आजीच्या डोळ्यासमोरच नातवाचा मृत्यू झाल्याने सदर आजीला प्रचंड धक्का बसला आहे.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वारजे माळवाडी पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, गणपती माथा भागात शनिवारी संध्याकाळी ०७:१५ वाजेच्या सुमारास खासगी बिल्डिंगमध्ये पाणी देण्यासाठी टँकर आला होता. पाणी ओतून टँकर पाठीमगे घेत असताना चालक सनी बारस्कर (रा. दत्तवाडी) याचा ताबा सुटल्याने गेटजवळ थांबलेल्या अदोक्षक हा टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी चालक सनी प्यारे बारस्कर (वय ३३, रा. दत्तवाडी) याच्यावर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांनी दिली.