शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कडक ऊन, पाऊस अन् सकाळी-रात्री थंडी; बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:40 IST

तापमानातील अचानक चढ-उतारामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी

पुणे : शहरासह जिल्ह्यात सध्या दिवसा कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. दोन दिवसांपूर्वी अचानक झालेला अवकाळी पाऊस आणि पहाटे व रात्री जाणवणारी थंडी अशा विचित्र हवामान बदलांचा अनुभव पुणेकर सध्या घेत आहेत. या अस्थिर वातावरणामुळे विविध आजारांच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तापमानातील अचानक चढ-उतारामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे व्हायरल संसर्ग, सर्दी-खोकला, ताप, घसा दुखणे यांसारख्या तक्रारी वाढत आहेत. याशिवाय उष्णतेमुळे घाम अधिक येत असल्याने त्वचेचे संसर्ग, तसेच दूषित पाणी आणि अन्नामुळे पोटाचे विकारही वाढले आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून दमा, मधुमेह किंवा हृदयविकार असलेल्या रुग्णांमध्ये या तक्रारी गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकंदरीतच वातावरणातील अनिश्चिततेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून, नागरिकांनी सजग राहून आवश्यक ती काळजी घेतल्यास या आजारांपासून बचाव करणे शक्य आहे.

बदलत्या वातावरणात आढळणाऱ्या प्रमुख तक्रारी :

सर्दी, खोकला, व्हायरल ताप, घशातील संसर्ग, ॲलर्जी, दमा वाढणे, जुलाब-उलट्या, पोटदुखी, त्वचारोग, तसेच उष्माघात (हीट स्ट्रोक). काही ठिकाणी डोळ्यांचे संसर्ग आणि डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांच्या रुग्णसंख्येतही वाढ होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. 

आजारांच्या वाढीची कारणे :

तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीमागे काही ठळक कारणे आहेत. हवामानातील अनियमित व जलद बदल. उष्णता आणि आर्द्रतेमुळे जिवाणू व विषाणूंची वाढ. पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित होणे. थंड आणि गरम वातावरणातील सतत बदल. अयोग्य आहार, उघड्यावरचे अन्न आणि अपुरी झोप.

उपचार व वैद्यकीय सल्ला :

लक्षणे दिसताच विलंब न करता उपचार घेणे आवश्यक आहे. ताप, सर्दी किंवा खोकल्यासाठी योग्य औषधी वेळेवर घ्यावीत. जुलाब किंवा उलट्या झाल्यास शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी ओआरएस आणि द्रवपदार्थ घ्यावेत. ॲलर्जी किंवा दम्याच्या रुग्णांनी डॉक्टरांनी दिलेली औषधी नियमित घ्यावीत. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी आणि पाणी, ताक, लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करावेत. स्वतःहून औषधी घेणे टाळावे, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

घ्यावयाची काळजी :

दिवसातून पुरेसे म्हणजे किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. ताजे व स्वच्छ अन्न सेवन करावे. उघड्यावरचे व शिळे अन्न सेवन कटाक्षाने टाळावे. उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा छत्री, डोळ्यावर गॉगल वापरावा. सोबत बाटलीबंद पाणी बाळगावे. हवामानानुसार कपड्यांची निवड करावी. हातांची स्वच्छता राखणे, पुरेशी झोप व नियमित व्यायाम, अशा सवयी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. 

हवामानातील बदलांमुळे सर्दी, खोकला आणि श्वसनमार्गाचे आजार वेगाने वाढतात. थंड-गरम वातावरणात सतत ये-जा केल्याने घसा दुखणे, टॉन्सिल्स सुजणे आणि नाक बंद होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. धूळ, परागकण आणि आर्द्रतेमुळे ॲलर्जी वाढते. सर्दी झाल्यानंतर दुर्लक्ष केल्यास सायनसचा त्रास वाढू शकतो. अशावेळी कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. थंड पाणी, आइस्क्रीम व थंड पेये टाळावीत. धुळीत किंवा प्रदूषणात मास्क वापरावा. सर्दी-खोकला दीर्घकाळ टिकल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. राहुल तेलंग, ईएनटी तज्ज्ञ, ससून 

बदलत्या हवामानामुळे शरीरावर ताण येतो आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता होऊन थकवा, चक्कर येणे, उष्माघात होऊ शकतो. दूषित पाणी व अन्नामुळे जुलाब, उलट्या आणि पोटदुखी वाढते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास व्हायरल तापाचा धोका वाढतो. यासाठी दिवसातून ३–४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ओआरएस, लिंबूपाणी, ताक यांसारखे द्रवपदार्थ घ्यावेत. ताजे व स्वच्छ अन्न सेवन करावे. ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे घेऊ नयेत. पुरेशी झोप व संतुलित आहार घ्यावा.  - प्रा. डॉ. हरिदास प्रसाद, विभाग प्रमुख, औषधीशास्त्र विभाग, ससून.

English
हिंदी सारांश
Web Title : Fluctuating Weather in Pune: Rise in Cold, Cough Cases Reported

Web Summary : Pune faces fluctuating weather causing increased cold, cough, and viral infections. Doctors advise precautions: stay hydrated, eat fresh food, avoid self-medication, and seek timely medical advice.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यPuneपुणेweatherहवामान अंदाजMaharashtraमहाराष्ट्र